दिग्दर्शकाची टीम आणि कार्यकारी निर्माता

युवा विवेक    29-Oct-2021   
Total Views |

दिग्दर्शकाची टीम आणि कार्यकारी निर्माता

 
assistant director_1 

असिस्टंट डायरेक्ट १ - आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर

या श्रेणीत येणाऱ्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या -

१. प्रत्येक कलाकारापर्यंत स्क्रिप्ट पोहोचवणे.

२. प्रत्येक कलाकाराला आपला कॉल टाइम सांगणे ( कॉल टाइम म्हणजे शूटिंगला किती वाजता आणि कुठे पोहोचायचं.)

३. सेटवर असलेल्या कलाकारांना तालिमीसाठी स्क्रिप्ट देणे. संवाद, अभिनय नीट करून घेणे. सीन समजावून सांगणे.

४. कलाकारांना ॲक्टिगसाठी गरज भासल्यास डमी ॲक्टर म्हणून मदत करणे.

५. ज्युनिअर आर्टिस्टस मॅनेज करणे.

...

२. असिस्टंट डायरेक्ट २ - कॅमेरा, लाइट्स, साउंड ॲंड एडिटिंग

१. दिग्दर्शकाच्या सुचनेनुसार कॅमेरामन आणि कॅमेरा अटेंन्डंट यांना सीन सांगून कॅमेरा सेटअप करून ठेवणे.

२. साउंड टीमशी को-ऑर्डिनेट करून त्यांना सूचित करणे.

३. क्लॅप करणे. ( प्रत्येक सीन सुरू होण्याआधी वापरली जाणारी लाकडी पट्टी. हिच्यावर चित्रपटाचा बॅनर, दिग्दर्शकाचे आणि चित्रपटाचे नाव, सीन क्रमांक आणि टेक क्रमांक लिहिलेला असतो.

४. जर Live Ediiting असेल, तर सीन शूट झाल्यानंतर Editor च्या स्क्रीनवर जाऊन सीन चेक करणे. सीनमध्ये चुकून कुणी अज्ञात Passer, अज्ञात वाहन, वस्तू असेल तर तो सीन पुन्हा शूट करावा लागतो. बऱ्याच चित्रपटांमध्ये या unwanted गोष्टी आल्याने सीनचे 'बिंग फुटते'. म्हणून हे प्रोफाइल अत्यंत चाणाक्ष आणि हुशार व्यक्तीला देणं गरजेचं असतं. 2000 मध्ये राज कंवर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बादल' चित्रपटातील एक सीन आठवतो. आकाश खुराणा काही आतंकवाद्यांना भेटायला त्यांच्या गावात जातात. ते गाव कश्मीर मध्ये आहे असे दाखवले गेले आहे. पूर्ण सीन उत्तमरीत्या शूट झालेला होता. पण शेवटी मागून BEST ची एक बस जाताना दिसते आहे, जिच्यावर BEST नाव स्पष्ट दिसते आहे. या चुकांमुळे Live Editting ची खूप गरज भासते. साउंडच्या बाबतीतसुद्धा अश्या चुका घडू शकतात, पण त्या डबिंग मध्ये सुधारता येतात. पण एकदा चित्रपट पूर्ण शूट झाला आणि स्क्रीनवर काही चुका झाल्याच तर, ही बाब खर्चिक ठरू शकते.

...

३. असिस्टंट डायरेक्ट ३ - Costume , Arts and Make-Up Co-ordinator

१. सीन सुरू होण्याआधी प्रत्येक कलाकार, सहकलाकार, ज्युनिअर आर्टिस्ट , इतर कलाकार, यांच्यापर्यंत Costumes पोहोचवण्याचे काम यांच्याकडे असतं. कलाकारांच्या लूक टेस्टची जबाबदारीही यांच्याचकडे असते. कुठल्याही आऊट डोर शूटसाठी प्रत्येक कलाकाराला लागणाऱ्या Costume ची व्यवस्था, मापं, रंग, कापड, अलंकार, Opticals, हे सगळं व्यवस्थित जमा करून ते सेट आणि नंतर कलाकारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वाटते तितकी सोपी नाहीये. बऱ्याचदा सेटवर टेलर असावा लागतो.

२. सीनच्या गरजेनुसार आणि दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार किंवा स्क्रिप्ट पाहून सेटवर प्रॉपर्टी आणून जागच्या जागी ठेवण्याची जबाबदारीसुद्धा यांचीच. एखाद्या दवाखान्यातल्या 'आयसीयू'मधील सीनमध्ये काय गोष्टी असतात, त्या कुठे आणि कशा ठेवलेल्या असतात याची पूर्ण माहिती यांना ठेवावी लागते. तसाच त्यावर खर्च किती होतोय, हे देखील बघावं लागतं. भिंतीवरचा रंग, Costume match, Jwellery, Optical Match, भिंतीवर असलेल्या फ्रेम्स, या सगळ्या गोष्टी हजर करणं यांचं काम असतं. सीन सुरू व्हायच्या आधी Property, Costume आणि MakeUp पूर्ण करून घेण्याचं काम यांच्याकडे असतं.

...

४. असिस्टंट डायरेक्ट १ - फिमेल आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर

१. प्रत्येक चित्रपटात एक Female Assistant Director असणं आता बंधनकारक केलेलं आहे.

२. स्त्री पात्राला सीन समजावून सांगणं, त्यांच्या मेक-अप ची आणि Costumeची तयारी करून घेणं , त्यांचा कॉल टाइम त्यांना सांगणं हे सगळं त्यांच्या प्रोफाइलमध्ये येतं. थोडक्यात, Assistant Director १ आणि २ यांच्या सर्व जवाबदाऱ्या यांना पार पाडाव्या लागतात, अर्थातच सगळ्याच Female Artists च्या बाबतीत.

३. Female Artists साठीचे Costume, Jwellery, ऑप्टिकल्स ,Make Up Kits ची जबाबदारी याची असते.

हे चारी Assistant Directors, खरं तर, दिग्दर्शकाचे कान आणि डोळे असतात. अर्ध्यावर जोखमीची आणि जवाबदारीची कामं यांच्यावर असतात. शक्यतो या प्रोफाईल मध्ये काम करत असताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. एखादी गोष्ट ऐनवेळी उपलब्ध नाही झाली, तर तिला ताबडतोब पर्याय शोधावे लागतात. सीन सुरू होण्याच्या तास-दोन तास आधी यांचं काम सुरू होतं. खासकरून Costumes आणि Property ची जवाबदारी सांभाळणाऱ्या Assistant Director साठी एक बाब महत्वाची ठरेल. तुमची शूट जर अति-दुर्गम भागात असेल, तर निघतानाच तुम्हाला स्क्रिप्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे सगळं साहित्य घेऊन जाणं इष्ट ! ग्रामीण भागात सहसा बऱ्याच गोष्टी उपलब्ध नसतात. ऐन वेळी फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे लागणारी हर एक चीजवस्तू बारकाईने तपासून , ती व्यवस्थित पॅक करून ठेवावी. त्याचप्रमाणे कॅमेरा आणि लाइट्सची व्यवस्थादेखील अशीच करून ठेवावी. Lenses , लागणारे lights त्यांचे Stands , Cables , Focus , Dim Lights , Reflectors या व्यवस्था नीट बघून घ्याव्यात.

पुणे, मुंबई, कोल्हापूर या पट्यात वारंवार होणाऱ्या चित्रीकरणामुळे बऱ्याच गोष्टी आता सहज उपलब्ध होतात. जरी नसल्या, तरी काही तासांत त्या सेटवर पोहोचू शकतात. पण त्यासाठी खर्च हा लागणारच आहे. आता शक्यतो काही गोष्टी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य केंद्रावर सहज उपलब्ध होऊ शकतात.पण Camera Lenses , lights, Focus, Stands मात्र जवाबदारीने सोबत घेणं गरजेचं आहे.

आता बघू या एक महत्त्वाची जबाबदारी...!

कार्यकारी निर्माता - Executive Producer.

चित्रपट जरी दिग्दर्शकाच्या खांद्यावर असला, तरी त्याची मोट मात्र EP ( Executive Producer ) च्या खांद्यावर तितकीच वजनाने ठेवली जाते. हे प्रोफाइल अत्यंत अनुभवी माणसाकडे असणं गरजेचं आहे. याच्यात काही गुण असणं बंधनकारक आहे.

१. Negotiater (बजेट जुळवणं)

२. Contacts.

३. Finance Managment.

...

१. Negotiation -

कलाकारांपासून ते Equiments पर्यंत लागणारी प्रत्येक गोष्ट लगेच EP पर्यंत पोहोचते. प्रमुख कलाकार, सहायक कलाकार, ज्युनिअर आर्टिस्टस पासून ते अगदी CameraMan , संगीतकार, गीतकार, MakeUp आर्टिस्ट, Costume , अगदी Spot Boys सुद्धा यांच्याकडून Set वर provide केले जातात. सुमारे 80-90 लोकांच्या राहण्याची आणि खाण्याची आणि इतर गरजांची पूर्तता करण्याचं काम EP करत असतो. देशात आणि परदेशात सुद्धा ही जवाबदारी त्यांना पेलावी लागते. त्यामुळे यांच्यात संपर्क यंत्रणा आणि Negotiation हे प्रमुख गुण असावे लागतात. प्रत्येकाला दिलं जाणारं मानधन, त्यांच्या Agreements, त्यांचे अकाउंट्स ठेवण्याचं कामही यांच्याचकडे. त्यामुळे लीगल माहिती असणं गरजेचं आहे.

चित्रपट महामंडळाने प्रत्येक डोमेनसाठी एक दरपत्रक ठरवून दिलेलं आहे. त्या दरानुसारच मानधन घेणं किंवा देणं बंधनकारक आहे. ते कसं द्यायचं आहे त्याचा सगळा तपशील चित्रपट सुरू होण्याआधी तयार करून ठेवावा लागतो.

EP च्या काही जवाबदाऱ्या आपण बघुयात.

१. Agreements

२. Payment Structure

३. Accomodation

५. Travelling

६. Equipments.

७. Catering

८. इतर Domains ची व्यवस्था.

याचे विवेचन पुढच्या भागात...