पियानो गीते

युवा विवेक    12-Dec-2022
Total Views |

piano geete
 
 
 

पियानो गीते

एकदा कुठेतरी वाचलंं होत की, जे संगीत ऐकून पाय हालतात (दाद देतात) ते पाश्चिमात्य संगीत असतंं आणि जे संगीत ऐकून डोकंं हलते (दाद देतात) ते भारतीय संगीत असतंंह्यातला देशप्रेमाचा भाग सोडला, तर संगीताला कोणतीही सीमारेषा नसते.

'पियानो' हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. १७ व्या, १८ व्या शतकात इटलीमध्ये कधीतरी बार्टलोमियो ख्रिस्तोफोरी नावाच्या कोण्या संगीतप्रेमीने तयार केलेले हे वाद्य आज त्याच्या देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरलं आहेहिंदी सिनेमातली कित्येक अविट गाणी पियानोवर रचली गेली आहेत. आठवून बघापार्टी रंगात आलेली असते. नायक, नायिका, सहाय्यक अभिनेता, खलनायक...! सगळेच पार्टीमध्ये 'भरी मैफिलमे मौजुद' असतात. पण नायक-नायिकेच्या नात्यात काहीतरी बिनसलेलं असतंं. एकमेकांपासून नजरा चुकवत म्हणा किंवा मिळवत म्हणा, आपला पडिक चेहरा घेऊन त्या उत्साही वातावरणावर विरजण टाकायचे काम ते इमानेइतबारे करत असतातअचानक नायकाच्या हितचिंतकाला काय अवदसा आठवते माहीत नाही; पण तो माईक नायकाच्या हातात देऊन त्याला गाण्याचा म्हणजे मैफिलको चार चांद लगाण्याचा आग्रह करतो, अन् मग हिरोपण आपल्या दिलाच्या दर्दाला सुरोमे बांधकर पेश करतो. दरम्यान नायिकेचा बाप त्याच्या कोण्या जुन्या मित्राच्या दोस्तीला रिश्तेदारीमध्ये तबदिल करायची अनाउंसमेंट करून बसलेला असतोपडद्यावर देव आनंद, दिलीपकुमारपासून अगदी आमिर खान, अजय देवगण, हृतिक रोशनपर्यत अनेकांनी अशी गाणी साकारली आहे. विशेषतः ९० च्या दशकात दीपक तिजोरी, टिकू तलसानिया, सदाशिव अमरापूरकर अशा अनेक सहनायकांनी आपल्या नायकाला ऐन ढासळत्या क्षणी गात केलं होतंपियानोवर गाणाऱ्या नायकाचा चेहरा आठवला की, सर्वात प्रथम कपुर घराणे डोळ्यासमोर येतंं.

 

दोस्त दोस्त ना रहा (राज कपुर), चले थे साथ मिलकर (शशी कपुर), दिलके झरोके मे तुझको बिठाकर (शम्मी कपुर), जीवन के दिन छोटे सही (ऋषी कपुर), दिल है मुश्किल (रणबीर कपुर)....!" काही कथानकात तर पियानो कथेचाच एक भाग वाटतो, 'मेरी जंग' मधला अनिल कपुर ज्या पियानोवर 'जिंदगी हर कदम एक नई जंग है' गातो तो पियानोच त्याच्या मुक्या आईची वाचा परत मिळवून देतोअंधाधुंध मधला आयुषमान खुराणाचा तर सगळा रोलच पियानोवादकाचा.!

 

कधी 'मोहरा' सारख्या सिनेमात ' काश कही ऐसा होता,' म्हणनारा अक्षयकुमारने साकारलेला प्रेमभंग झालेला नायक असो तर कधी प्रेयसीला 'इस तरह आशिकी का असर छोड जाऊगा' म्हणणारा इम्तिहान मधला सनी देओल ….…. पियानोशिवाय भारतीय सिनेमालाच एक रितेपण येईल.

छुपानाभी नही आता (बाजिगर)

मै दुनिया भुला दुंगा (आशिकी)

तु प्यार है किसीं और का (दिल हे के मानता नही)

जिता था जीसके लिए (दिलवाले)

अशी किती गाणी आठवावी?? थोडं अजुन मागे गेलं तर

और इस दिलमे क्या रखा है (इमानदार)

कभी सोचता हू (मजबूर) ,

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो (गुमराह)

मेरे दुश्मन तु मेरी दोस्ती को तरसे (आए दिन बहार के )

जवा है मुहब्बत हसी है नजारा (अनमोल घडी)

हम आज कही दिल खो बैठे (अंदाज)

ख्वाब हो या तुम कोई हकीकत ( तीन देवीया)

कोई सोने के दिलवाला (माया)

पत्थर के सनम (पत्थर के सनम )

प्यार दिवाना होता है (कटी पतंग)

गीत गाता हु मै गुणगुणता हु मै (लाल पत्थर)

आती रहेगी बहारे (कस्मे वादे )

मधुबन खुशबू देता है (साजन बिना सुहागन )

अशी कित्येक गाणी आठवतील.

नायक आणि त्याचा पियानो हा बॉलिवूडचा एक रम्य भाग आहे. सैगलपासून अरिजित पर्यंत अनेकांचे दर्दभरे आणि हर्षभरीत नगमे खेड्यापाड्यात ट्रक, टॅक्सी, रिक्षा, काळी-पिवळीमध्ये वाजत असतात. पण त्यातल्या त्यात 90s ची बात और आहे. सोनू निगम, उदित नारायण ह्यांना मानणारा वर्ग कितीही मोठा असला तरी कुमार सानुची दर्दभरी गाणी ऐकणारा एक वेगळा श्रोतावर्ग देशात आहे. पियोनोने असे अनेक अलवार क्षण गाते केले आहेत तर मग आज की शाम, उन नगमोके नाम

 
- सौरभ रत्नपारखी