पूर्णापूर्णत्वाचा उंबरठा

युवा विवेक    20-Dec-2022
Total Views |

umbartha
 
 
 
पूर्णापूर्णत्वाचा उंबरठा
 
एखाद्याचं असलेलं...
किंवा असूनही नसलेलं
किंवा खरंतर असलेलचं
किंवा आहेच याची जाणीव असलेलं
तरीही अडखळलेलं पूर्णापूर्णत्वाच्या उंबरठ्यावर..
सोनचाफ्याची ओंजळ घेऊन अवघडलेलं..
खोळंबलेलं अर्ध-उणं अस्तित्व!
शांत करतं की उमाळे भरून आणतं आसुसलेपणाचे..
कुणास ठाऊक !?
असतातचं अशी अस्तित्वं...शालीसारखी
सौरक्षणार्थ ऊब देणारी;
ही 'ऊब' प्रचंड विश्वास-आत्मविश्वास असतो आपणच आपल्यात बाणवलेला..
ही ऊब ऊर्जा असते, चैतन्य असते हिरवी कंच शाल असते सृजनाची.. आपणच आपल्याला पांघरवलेली
जिच्यामुळे शोभावा देह..खुलावे सौंदर्य नि आत्मविश्वासही..
ही शाल आपल्यातल्या अर्धकच्च्या गाभूळ अस्तित्वाची...
सुरक्षित,निर्धास्त आणि निःसंकोचान शिरावं जिच्या कुशीत..
स्वतःला शांत आणि सुरक्षित करण्यासाठी.…
अमिता पेठे पैठणकर