गुलजारचे अग्निरंग

युवा विवेक    19-Sep-2022
Total Views |

gulzarche agnirang
 
 

गुलजारचे अग्निरंग

कधी कधी एखाद्या कवीचे किंवा गीतकाराचे एखाद्या भावनेशी, शब्दाशी अथवा ऋतूशी आगळेवेगळे नाते जोडले जाते.  आता हेच बघा ना.. नाधोमहानोर ह्यांच्या गीतातल्या पावसाच्या विविध छ्टा पाहून पु. .देशपांडे त्यांना गंमतीने "धो.धो.महानोर" म्हणाले होतेनामदेव ढसाळांच्या कवितेतील विद्रोही बाणा किंवा समीरच्या उडत्या चालीच्या धमाल गीतांमध्ये पण हा समान धागा आहे की. आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा रेखाटल्या जात असताना त्या गीतकारांची छाप त्यावर नेहमी जाणवत असतेबोरकरांच्या कवितेतील गोव्याची हिरवीगार भूमी आणि बहिणाबाईंच्या ओव्यामागचं गरगर फिरणारे जातं,  ह्यांच नातं देखील एकच !

 

ह्या सर्वांप्रमाणेच 'गुलजार आणि आग' हे देखिल एक वेगळच समीकरण आहे. एकाच कवीने आगीच्या किती म्हणून छटा पडद्यावर रंगवाव्या कल्पना करून बघा"एक छोटासा लम्हा है, जो खत्म नही होतामै लाख जलाता हू, वो भस्म नही होता'माचिस' मधल्या 'छोड आए हम' गाण्यातलं हे कडवं ! मनाच्या कोपऱ्यात आजही कुठेतरी खोलवर आग धुमसत ठेवली आहे. आज इतक्या वर्षांनी देखिल त्याचा धूर भावविश्व व्यापून उरतोलेखणीतून ठिणग्या पाडत गुलजारने कित्येकदा वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटली आहे किंवा पेटवली आहे म्हणा.

 

ओंकारा मधील 'बिडी जलाइले जिगरसे पिया जिगरमा बडी आग है' आठवतय कात्यातली आग ही भावना चाळवणारी आहे. पडद्यावर बेधुंद नाचणाऱ्या बिपाशा बासू आणि विवेक ओबेरॉयच्या त्या गीताला पार्श्वभूमी होते ती बिहारच्या स्थानिक राजकारणाची, तर माचिसच्या कथेला पार्श्वभूमी होती पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीची !

 

दोन वेगळ्या प्रांताची आणि भावनांची आगींच्या माध्यमातून आशयाला पूरक अशी मांडणी करणे गुलजारच जाणे! 'दिल से' मधल्या 'जिया जले जां जले, नैनो तले धुवा जले' मधली आग विरहाची धग जाणवून देते. इथेही धूर आहे, आग आहे.. पण ती वेगळ्या अर्थाने. त्यात पुन्हा रहमानच्या अवीट सुरावटीवर दाक्षिणात्य मल्याळी शब्दांची पखरण पण भाषेची परिणामकारकता तेवढीच !

 

स्लमडॉग मिलेनियरच कथानक मुंबईमधल्या झोपडपट्टीचेइथला नायक 'जय हो' म्हणत असता ती मनातली आग दुर्दम्य आशावाद दाखवत असतें. आपण गरिबीतून वर येऊन दुनियादारीशी झगडलो आहोत. आज ज्या उंचीवर आहोत त्यासाठी खूप संघर्ष केला आहे. म्हणून नायकाच्या मनातली आग म्हणते की, "गिन गिन तारे मैने उंगली जलाई है"...."नच नच कोयलोपे रात बिताई है"! एकीकडे ही दुनियादारी शिकवणारी आग, तर दुसरीकडे प्रेम हीच आपली दुनिया मानणाऱ्या आपल्या प्रियकराच्या आठवणीने व्याकुळ करणारी आग म्हणते "तुम गए हो नूर गया है, नही तो चरागोसे लो जा रही थी ||"  प्रेमरसात न्हाऊन आपल्या साथीयाला म्हणते "गरम गरम उजला धुवा, नरम नरम उजला धुवा!" आग कधी गरम किंवा नरम असू शकते का?  पण गुलजारच्या शब्दातून ती भावना आपल्याला जाणवत राहते.

 

उद्याची स्वप्ने पाहताना गुलजारच्या लेखणीतून नवे जग नव्या आगीसह उभे राहते.

"मेरे घर के आँगन में | छोटा सा झूला हो || सौंधी सौंधी मिटटी होगी | लीपा हुआ चूल्हा हो ||

थोड़ी थोड़ी आग होगी | थोड़ा सा धुँआ || तीनको का बस एक आशिया | थोडीसी जमीन थोडा आसमा…||"

धकाधकीच्या आयुष्याच्या वळणावर जेव्हा कधीतरी दोन घडी विश्रांती घ्यावीशी वाटते, तेव्हा गुलजारच्या गीतातील आग तिथेही आपल्याला गाठते आणि उबदार पांघरून ओढताना म्हणते"जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर | आँखों पे खींचकर तेरे आँचल (दामन) के साये को | औंधे पड़े रहें कभी करवट लिये हुए | दिल ढूँढता है फिर वही फुरसतके रात दिन…"

 

त्याच्या लेखणीने आगीच्या, उन्हाच्या, धुराच्या अशा विविध छटा दाखवल्या आहेत. आगीची एवढी रूप त्यांना कशी उमजली असावी हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा उत्तर त्यांच्या शायरीतूनच मिळते"आँखों के पोछने से लगा आग का पता | यूँ चेहरा फेर लेने से छुपता नहीं धुवा"

 

- सौरभ रत्नपारखी