बदलूयात का भूमिका ?

युवा विवेक    06-Sep-2022
Total Views |

badaluyaat ka bhumika?
 
बदलूयात का भूमिका ?
तू हो नदी...
मला समुद्र होऊन बघायचंय
तुझं जगणं जगायचंय..
अफाट,अपरिमित,असीम...
अमर्यादित स्वतःला पडताळायच आहे..
समुद्र होउन जगायचं आहे..
अनुभवायच आहे तुझं जडत्व !
अनादी काळा पासून कड्या कपारीतून आदळत आपटत,
वाट काढत..
कधी आवेग धारण करून,
कधी संथ होउन,
कधी मातृत्व स्वीकारत
सुख दायीनी होऊन..
कधी रौद्र रूपही अंगी लेवून..
वाहून,वाहत राहून थकलेय मी अता!
पुरेच..
समुद्राss..
घे माझी जागा..
अनुभव थोडे सुख तुही
नि त्याबरोबर येणारे भावनांचे चढ उतारही...
तू जितका निश्चल तेवढी मी प्रवाही..
मन गुंतलं कुठे तरी थांबाय रंगाळायची चैन विधात्याने माझ्या नशिबी लिहिलीय कुठे ?
अगदी काळजाच्या तळातून वाटते
घ्यावास अनुभव तुही..
क्षणा क्षणाला होणाऱ्या त्या प्रचंड उलथा पालथीचा..
सगळं सामावून घेतोस स्वतःत
जीवनचक्राचा मुलाधार तू आहेस मान्यच..
पण तरीही विनंती आहे तुला
करूयात का भूमिकांची अदलाबदली...
घेऊयात समजून एकमेकांना!!
अमिता पैठणकर