तू सख्या रे

युवा कविता

युवा विवेक    09-Oct-2023   
Total Views |

तू सख्या रे

स्तब्ध आहे रात्र अजुनी

पहाट अलगद येईल आता

हरू नको तू सख्या रे

का उगाच त्रास जीवा....

का उगाच खचायचे

का उगीच हरून जायचे

हसत हसत काळास त्या

तूला आता सामोरी जायचे.

घडायचे ते घडून गेले

भविष्य तर हाती आहे

भावी सुंदर आयुष्य तुझे

असे का संपवत आहेस..

उठ आता अन लढ नक्की

कर सामना धैर्याने

सोबतीस आहेत सारे

नाव घ्यावया अभिमानाने.

- मैत्रेयी सुंकले