Intermittent fasting योग्य की अयोग्य

युवा विवेक    04-Feb-2023
Total Views |

Intermittent fasting योग्य की अयोग्य
 
नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला माहिती देणार आहे intermittent fasting या डाएटच्या प्रकाराची. अनेकांना या प्रकाराबद्दल उत्सुकता असते. शिवाय झटपट रिझल्ट देणारा डाएट म्हणून याला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. परंतु तरीही हा डाएट मानसिक रुग्ण, गरोदर स्त्रिया, आजारी रुग्ण, एखाद्या दीर्घ आजारावर उपचार घेत असणारे लोक यांनी घेऊ नये असे डॉक्टरांकडून सुचवले जाते. याचे कारण काय? जर खरंच हा डाएट उत्तम रिझल्ट देत असेल तर सर्वांनी त्याचा लाभ का घेऊ नये? वाचा…
Intermittent fasting हा एक नव्याने रुजू पाहणारा ट्रेंड आहे, ज्याला फार कमी आणि theoretical scientific base आहे. आपल्या शरीरात कार्ब्स घेणे बारा तासांसाठी थांबवले की शरीरात कार्ब्सची deficiency निर्माण होते. मग शरीरातील निरनिराळ्या प्रक्रियांसाठी लागणारी एनर्जी मिळवण्यासाठी alternate सोर्स म्हणून शरीर फॅट्स वापरते. त्यामुळे फॅट्स घटू लागतात आणि वजन कमी होते. हाच आहे तो scientific base. मी या बेसला कमी यासाठी म्हटले कारण हा प्रयोग आधी प्राण्यांवर केला गेला. बारा तासांहून अधिक काळ त्यांना उपाशी ठेवून त्यांच्या ब्लड शुगर लेव्हल तपासल्या गेल्या. त्यात शुगर अत्यल्प आढळली. प्राण्यांच्या वजनातही घट झाली. परंतु कालांतराने या प्राण्यांवर काय परिणाम होऊ शकतात याच्या कोणत्याही चाचण्या केल्या गेल्या नाहीत. जे काही होते ते तात्पुरते होते.
हाच फंडा जर माणसांना लावला गेला आणि बारा तासांहून जास्त काळ उपाशी राहण्याचा प्रयोग केला तर निश्चितच कार्ब्सची कमतरता निर्माण झाल्याने फॅट्स कमी होऊ लागतील. परंतु आवश्यक जीवनसत्वांची कमतरता निर्माण होईल त्याचे काय? ती कशाने भरून काढणार? दिवसातून दोनच वेळा खाणार असाल तर खाऊन खाऊन किती खाणार? आणि खरंच पोट तुडुंब भरेपर्यंत खाल्ले तर ते नीट पचेल का? मग जो भाग पचणार नाही त्याचे एकतर फॅट्समध्ये रूपांतर होईल किंवा तब्येतीला त्रास होईल.
अनेक जण विचारतात की जर intermittent फास्टिंग इतकं धोकादायक आहे तर मग अनेक जण ते का करतात? आणि अनेकांना त्याने फायदा कसा काय होतो?
याचे उत्तर अगदीच सोपे आहे. समजा तुम्ही अचानक आजारी पडलात आणि सात आठ दिवस तुमच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही, तर तुमचे वजन कमी होईलच ना? त्याच प्रमाणे intermittent फास्टिंगमध्ये कॅलरीज कमी घेतल्या गेल्यामुळे वजन कमी होते. फक्त intermittent फास्टिंग नाही तर सर्वच प्रकारच्या डाएटमध्ये वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसीटचा फंडाच वापरला जातो. त्याशिवाय वजन कमी होणारच नाही. मात्र समजा तुम्ही intermittent फास्टिंग करून दिवसभरात 1000 कॅलरीज घेतल्या आणि सेम 1000 कॅलरीज दिवसातून पाच वेळा खाऊन घेतल्यात, तर दोन्हीने वजन सारख्याच प्रमाणात कमी होईल. या परिस्थितीत intermittent फास्टिंगने जास्त चांगला रिझल्ट मिळू शकत नाही. उलट फार काळ उपाशी राहिल्याने मेटबॉलिझम मात्र नक्कीच स्लो होऊ शकते.
Intermittent फास्टिंग कुणासाठी लाभदायक आहे?
१. महिन्याभरात कुणाचे तरी लग्न आहे, कसले तरी सेलिब्रेशन आहे, काहीतरी खास कपडे घालायचे आहेत. म्हणून झटपट वजन कमी करायचे आहे, मात्र लग्न किंवा सेलिब्रेशन उरकल्यानंतर काही फरक पडणार नाही, अशांना त्वरित परिणाम मिळण्यासाठी intermittent फास्टिंग उपयोगी आहे.
२. आरशात सुंदर दिसणे महत्वाचे, त्यासाठी कितीही तास उपाशी राहण्याची तयारी असणारे. ज्यांना या प्रोसेसमध्ये हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन्स, आयर्न, कॅल्शियम या सगळ्या घटकांत काहीही बदल झाला, कितीही कमतरता निर्माण झाली तरी फरक पडणार नाही आहे. त्यांचा उद्देश फक्त वजन कमी करणे इतकाच आहे आणि त्यासाठी ज्यांना कमीत कमी वेळ द्यायचा आहे अशांसाठी हे डाएट उपयुक्त आहे.
३. फारच बिझी असणारे लोक... ज्यांना सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच, संध्याकाळी स्नॅक्स आणि रात्री डिनर असे वेगवेगळे पदार्थ बनवायला वेळ नाही, बनवले तर खायलाही वेळ नाही
४. आळशी लोक... ज्यांची सकाळच 11 वाजता होते, त्यामुळे जाग येते तेव्हा ब्रेकफास्टची वेळच निघून गेल्यामुळे डायरेक्ट दुपारी जेवणेच ज्यांना सोयीचे पडते अशांनाही हा डाएट लाभदायक आहे.
इतर सर्वसामान्य माणसे, ज्यांना स्वतःला योग्य वेळ देता येतो, ज्यांच्यात चांगले अन्न सेवन करण्याबद्दल उत्साह असतो, आपल्या शरीराचा जे आदर करतात, आणि मुख्य म्हणजे आरशात आपण कसे दिसतो यापेक्षा ज्यांना आपल्या ब्लड टेस्ट नॉर्मल येणे महत्वाचे वाटते... अशा सर्व व्यक्तींना माझी विनंती आहे... कोणत्याही फॅड डाएटच्या मागे लागू नका. शरीर अनमोल आहे, त्याला कवडीमोल भावाची वागणूक देऊ नका.
पुन्हा भेटू या अशाच एखाद्या नव्या विषयासह.
Till then stay healthy be happy.
दीप्ती काबाडे
आहारतज्ज्ञ