चालताना खरी साथही पाहिजे

युवा विवेक    17-Apr-2023
Total Views |

 चालताना खरी साथही पाहिजे

चालताना खरी साथही पाहिजे

चालण्याला तशी वाटही पाहिजे

बोलताना किती फिरवितो शब्द तू

बोलताना खरा स्टँपही पाहिजे

याद येते तुझी.. सांग उपचारही

आठवांचा कुणी वैद्यही पाहिजे

भेट झाल्यावरी वाटते की असे

थांबवाया जरा वेळही पाहिजे

फुंकरीला तुझ्या काय जादू अशी

वेदनेला तुझी साथही पाहिजे

थेट नजरेतुनी वार करतोस तू

टाळण्या वार तो शस्त्रही पाहिजे

दाद यावी असे वाटते ना तुला

भावणारी तशी ओळही पाहिजे

 

- श्वेता बरकडे.