
क्रिकेटने मला काय शिकवले..
१. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करा.
गोष्ट आहे मार्च २०१८ ची. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा कसोटी सामना चालू होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरॉन बँनक्रोफ्ट हा टीव्ही वर सँडपेपरने नी बॉलशी छेडछाड करताना निर्देशनास आला. ज्यात ऑस्ट्रेलियाचा वाइस-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर देखील पकडला गेला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा नक्कीच एक काळा दिवस होता. यावर कारवाई म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डनी कॅमेरॉन बँनक्रोफ्ट वर क्रिकेट खेळण्यासाठी ९ महिन्यांचा बॅन आणला. एवढेच नाही तर तत्कालीन ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव स्मिथ आणि वाइस-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर यांच्यावर १ वर्षाचा बॅन आणला. स्टीव स्मिथवर पुढील दोन वर्षांसाठी तर डेव्हिड वॉर्नर वर आयुष्यभरासाठी कॅप्टनशीपवर बॅन आणला. फक्त टीम चा कॅप्टन असल्यामुळे स्टीव स्मिथ वर बॅन आणला गेला. यानंतर स्टीव स्मिथ एका पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला.
यानंतर जवळपास सव्वा वर्षाने स्टीव स्मिथने Ashes २०१९ च्या माध्यमातून क्रिकेट मधे पुरागमन केले. तो सव्वा वर्षाचा कालावधी नक्कीच स्मिथसाठी कठीण होता. त्याच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही सगळ्यात मोठी संधी होती. Ashes इतका प्रबळ मंच त्याला शोधूनही सापडला नसता. Ashes म्हणजे क्रिकेट मधील सगळ्यात मोठी सिरीज. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया!
या सिरीज मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा स्मिथ बॅटिंगसाठी मैदानात उतरला तेव्हा इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्मिथचे रडणारे मुखवटे लावून, सँडपेपर फडकवून स्मिथचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. स्मिथ ने तेव्हा काहीच केले नाही पण त्याने उत्तर त्याच्या बॅटने दिले. पहिल्याच मॅचच्या दोन्ही इनिंग्स मधे शतक करून तो प्लेयर ऑफ द मॅच झाला. पूर्ण Ashes च्या ५ सामन्यांमध्ये त्याने ७७४ धावा केल्या. Ashes १९८२ पासून ते Ashes २०१९ पर्यंतचा तो पाचवा सर्वाधिक धावा काढणारा ठरला. स्मिथच्या या खेळीने त्याच्या सर्व आलोचाकांना त्याची प्रशंसा करण्यासाठी भाग पाडलं! स्टीव स्मिथ या नावाने स्वतःला सिद्ध करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दिमाखात पुनरागमन केलं..!
खरंय.. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करा..!
- देवव्रत वाघ