मी सिग्नलला थांबलो होतो. सिग्नलवर लावलेल्या क्लॉकवर एक एक सेकंद कमी कमी होत
होता आणि मी माझ्या विचारात गढू न गेलो होतो. कालच एक नवा प्रोजेक्ट आला होता त्यावर
काम सुरू करायच होतं. मागच्या आठवड्यात एक प्रोजेक्ट आला होता त्याची ड्यू डेट उद्या होती
आणि आजच काम झालेल होतं. अचानक मला हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि मी भानावर
आलो आणि पहिलं तर सिग्नल संपत आला होता पण ह्या हॉर्नने माझ्या विचरांची संततधार लय
मोडली होती. मी वळू न माझ्या डाव्या बाजूला पहिलं आणि...
खरतर हा माझा रोजचा रास्ता होता . माझ्या आयुष्यातल्या कित्येक आठवणी ह्या रस्त्याशी
जोडल्या गेल्या होत्या. पण कर्तव्याची झापडं लावलेल्या मला इतके वर्ष ह्या सिग्नलला डावीकडे
पाहायची कधी आठवणच झाली नव्हती. कदाचित मीच, ती आणि तिच्यासोबत जोडल्या गेलेल्या
अनेक आठवणी मागे टाकून पुढे आलो होतो इतका की त्यांच्या अस्तित्वाचा भासदेखील मला
आता होत नव्हता पण...
आज त्या हॉर्नच्या निमित्तानेच का होईना पण मला दिसलं होतं, केक्स् कॉर्नर .....
अजून तसच होतं, त्याला ना जीर्णतेच वास्तव होतं, ना श्रीमंतीचा बडेजाव, त्याला ना बदलाचा
स्पर्श झाला होता ना जुनेपणाची मरगळ आली होती. मी मागे ठे वलेल्या माझ्या कित्येक आठवांचा
आणि आणाभाकांचा गोडवा अजून त्याने तसाच त्याच्या केक्स् मध्ये भरून ठे वल्यासारखं वाटत
होतं.
काही वर्षांपूर्वी मी निग्रहाने ज्या जागी जाणं नाकारलं होतं, त्याच जागेचे हे आजच बोलावणं मी
धुडकावून लावू शकलो नाही आणि माझी गाडी अनाहूतपणेच त्या केक्स् कॉर्नरच्या पार्किं गमध्ये
जाऊन थांबली. डोकयावरच हे लमेट उतरलं, क्षणभर वाटलं “ अगं उतर ग लवकर “ म्हणावं पण
पुढच्या क्षणी जाणीव झाली की मागे कोणीच नाहीये. आज कितीतरी वर्षांनी ही जाणीव चटका
लावून गेली.
पण काळ जसा पुढे सरकतो तशी जाणिवांची धार बोथट होत जाते; कुठू नतरी नाहीशी होते,
कुठे तरी थोडीशी उरते आणि आज मी त्याठिकाणी आलो होतो जिथे त्या जाणिवांची धार तशीच
होती. मी गाडी पार्क केली आणि दरवाज्याच्या दिशेने चालायला लागलो. आजवर कधीही न
जाणवलेली विरक्ती त्या पावलांमध्ये आली होती कारण या पूर्वी मी या ठिकाणी एकटा कधीच
आलो नव्हतो आणि असा कोर्या मनाने तर नाहीच नाही.
आजच्या या जागेच्या भेटीमध्ये चैतन्य नव्हतं, एक बोच होती, इथे येण्यात आनंद नव्हता तरीही
एक ओढ होती. आपण नाकारलेल्या एखाद्या व्यक्तीकडे जाताना मनाची जी स्थिति होते तशीच
काहीशी अवस्था माझ्या मनाची झाली होती. पण माझ्या मनात असलेली ती भावना आता माझ्या
सगळ्या स्वार्थ, अहम, स्वत्व ह्यांच्यासीमा ओलांडू न गेली होती. आता मला पुन्हा जायचं होत त्याच
ठिकाणी त्याच टेबलवर .....
मी केक्स् कॉर्नरमध्ये पाय ठे वला आणि मला समोर दिसत होता तो, तो टेबल; जिथे मी माझ्या
आयुष्यातल्या सर्वात सुगंधी क्षणांची उधळण केली होती. तिच्या एका एका कटाक्षासाठी
स्वत्वाची आहुति दिली होती. तिच खळखळू न हसणं पहाण्यासाठी स्वतःवरच्या विनोदांचे झरे
ओतले होते . तिचा एखादा अस्फुट स्पर्श मिळवण्यासाठी माझ्या सर्वांगाची धरा धरली होती . पण......
तो टेबल आता रिकामा होता त्यावर माझ्या भावनांची ओल कुठे च नव्हती. माझ्या जाणिवांची
पालवी नव्हती. माझं अस्तित्वही तो आता साफ विसरून गेला होता. पण तो जसा मला पुर्णपणे
विसरून गेला होता तसचं त्याने तिच्या कृतघ्नतेचे डाग देखील पुसले होते. तिच्या खोटेपणाचे
सगळे भाससुद्धा धुतले होते. तो रिकामा होता पण एकटा नव्हता. मला ओळख देत नव्हता पण
विसरला देखील नव्हता कदाचित. त्याला मापासून वाटत होत मी त्यच्यापाशी जावं, बसावं पण......
त्यालाही कदाचित माझा राग आला असेल; नसेल कदाचित तो सजीव पण त्याच्यात
निर्जीवपणाची कोणतीही लक्षण नव्हती. प्रत्येक सजीवमध्ये नांदणार चैतन्य त्याच्यापाशी पण
होतच की, तो ही रोज नव्याने नटायचा, नव्या नव्या लोकांना भेटायचा त्यांच्या आठवणींचा भाग
व्हायचा, त्यांच्या गोष्टीतलं पात्र व्हायचा, आणि पात्र ही कायमचं जीवंत असतात, होताचं तो
सजीव. आता प्रश्न होता पुढाकार कोण घेणार , शेवटी मीच विचार केला, त्याचा राग राग
करण्यासारख त्याने काहीच केलं नव्हतं, तो फक्त साक्षीदार होता चांगल्याचा आणि वाईटचा,
तिने मला दिलेल्या शपथांचा आणि वचनांचा. तो फक्त साक्षीदार होता, तिने केलेल्या माझ्या
फसगतीचा, तिने केलेल्या माझ्या दुर्गतीचा. तो स्वतः मात्र कशातच नव्हता पण.........
मी मात्र त्याचा उगाच राग राग केला ,पुन्हा कधीच त्याला न भेटण्याचा निश्चय केला , माझ्या
आठवणीतून त्याला पुसण्याचा प्रयत्न केला; नव्हे करतोय कदाचित... आणि मग हेच त्याने केलं
असेल तर त्यात वावगं काय ? तो त्याच्या जागी योग्यच होता आणि मुळात तो त्याच्याच जागी
होता भटकत मीच होतो . पण .......
आज गेली कित्येक वर्ष भटकणारी, बर्याचदा भरकटलेली माझी पावलं या केक्स् कॉर्नरमध्ये
परत आली होती आणि मी माझी चूक मान्य करून; माझ्यासाठी जीवंत पण जगासाठी निर्जीव
टेबलपाशी जाऊन बसलो. इतका वेळ मला वाटत होतं ते त्याच कोरडेपण कुठच्या कुठे हरवून
गेलेलं होतं आणि तो मला कितीतरी वर्ष मागे घेऊन गेला. किती आठवणी समोर आल्या कितीतरी
हरवलेली स्वप्न दिसू लागली , कितीतरी अर्पण दिसू लागली . पण ...........
आता ती मला असह्य करत नव्हती. अर्थात आनंदही देत नव्हती पण कदाचित विस्मरणामुळे
असेल किं वा कालक्रमामुळे असेल मी त्याचा स्वीकार केला होता. पण हा स्वीकार तरी खरा होता
कशावरून ? मला आजही तीच नसणं खुपतच आहे की. आज या टेबलवर माझ्या शेजारी ती
नाहीये ह्याचा मला त्रास होतोच आहे की. आणि ती आज असायला हवी होती; नव्हे आज तीच
सोबत असायला हवी होती असं पण वाटतच आहे की; हे सगळं वाटत असताना एक शंका मनात
सारखी डोकावते आहे पण...
तिला हे कधी कळे ल का ? तिला माझी, ही अवस्था महितीतरी आहे का ? तिच्या मी
आठवणीत तरी आहे का ? ती ज्या दिवशी मला ह्याच टेबलपाशी सोडू न गेली; एकट्याला सोडू न
गेली . पण…
एकट्याला तरी कसं म्हणू ती होती तेव्हा सारं काही आलबेल होतं, ती गेली आणि जाताना खूप
काही देऊन पण गेली; हो खूप काही; असंख्य शंका, मी खरच कुठे चुकलो ? मी काय नव्हतं
करायला हवं ? तिने का मला एखाद्या जळत्या घरला टकाव तसं टाकलं? माझी खरच लायकी
आहे का ह्या जगात प्रेम करयची ? नव्हे जगायची तरी ? पण…
कित्येक प्रश्नांची उत्तरं कधीच मिळाली नाहीत; पण नाही म्हणायला मी मनाची खूप समजूत
घालत होतो आणि त्याशिवायही मी आणखीन करू काय शकणार होतो. तिच्यासाठी स्वत्वाचा
व्यापार केल्यावर माझ्या हाती दुसरं उरलच काय होतं. स्वतःची समजूत काढण्याशिवाय. पण…
खरच किती विदारक चित्र होतं ते; निश्चित माझंच पण भीषण, विजेच्या तारेत अडकलेल्या
पतंगाच्या आयुष्यासारखं ज्याला ना आकाशाने कवेत घेतलय ना पुन्हा धरणीवर यायची मुभा
आहे . त्याने बसं लटकत राहायच कोणीतरी कधीतरी ह्या तारेतून सोडवेल ह्या आशेवर आणि
काळासोबत फिकट होत जायचं , वार्यासोबत फाटत जायचं, ना जगायच ना मारायचं. पण…
मंज्याला त्याच काहीच सोयर सूतक नसतं तो नव्या पतंगला बांधला जातो आणि त्याला हवेत
फेकू लागतो. ती त्या मंज्यासारखीच होती का ? असेल कदाचित; कदाचित नसेलही पण त्या
दिवसानंतर तिला मी पाहिलं तरी कुठे होतं ? तिची पाठमोरी दूर जाणारी आकृती आजही तशीच
दिसते आहे तितकीच स्पष्ट, अरे ती पहा ती चालली दरवाज्याच्या बाहे र; निदान आज तरी थांबव
तिला, विचार तुझे सगळे अनुत्तरित प्रश्न, विचार तिच्या कृतघ्नतेच कारण, विचार तिला, तुला
माझी ही अवस्था करायचा अधिकार कोणी दिला होता ? तुला सगळ्याच गोष्टी एकटीने
ठरवण्याच स्वातंत्र्य दिल होत कोणी ? अरे विचार; विचार ना… पण…
कुणाला , कशासाठी संपल आहे आता सगळं . खरतर बर्याच वर्षांपूर्वी आता ना ती उत्तरदायी
आहे ना मला प्रश्न विचारायची इच्छा आहे . आता मी इथे फक्त अनाहूतपणे आलो म्हणून नाहीतर;
ती होती कुठे इकत्या वर्षात? मनात नाही, विचारात नाही आणि आयुष्यात तर नाहीच नाही. पण…
ऑर्डर मी दोन चोकोलेट पेस्ट्रींचीच दिली होती, आणि आता त्या दोन्ही माझ्या समोर होत्या
त्यातली माझी पेस्ट्री मी खात होतो आणि समोरची तशीच होती… आणि आता ती तशीच राहणार
होती कारण ती माझी नव्हतीच मुळात… मी उठलो बिल दिलं. केक्स् कॉर्नरच्या बाहे र पडलो
आणि त्या संध्याकाळच्या गर्दीत पुन्हा गर्दी होऊन गेलो…
समर्थ चाफेकर