बोलू काही जगण्यावरती
जग हे सुंदर आहे
इथल्या पाषाणातही
खऱ्या जगण्याचा मृद्गंध आहे
इथल्या प्रत्येक श्वासामध्ये
प्रतिभेचा वसंत आहे
तोच गोडवा देतो
अन् तोच दुःखही देत आहे
अश्रूंची फुले होतात
जेव्हा जगणं कळतं
जगण्यातही वसते उमेद
जेव्हा वागणं कळतं
इथेच सारे उमलतात
अन् इथेच सारे कोमेजतात
आयुष्य आनंदी होते
जवं दिशा साऱ्या समजतात
बोलू काही जगण्यावरती
आयुष्य सुंदर आहे
आयुष्याच्या वळणावर
खुप काही शिकणं आहे
म्हणूनच लिहा एक कविता
प्रेम असू द्या कवितेवरचं
प्रत्येकांनी प्रेम सोडू नये
स्वतःच्या जगण्यावरचं
अंकुश शिंगाडे