मु. श्री. कानडे आंतरमहाविद्यालयीन नाट्य समीक्षा लेखन स्पर्धा

युवा विवेक    04-Dec-2025
Total Views |

मु. श्री. कानडे आंतरमहाविद्यालयीन नाट्य समीक्षा लेखन स्पर्धाडेक्कन एज्युकेशन सोसायटीचे

फग्युर्सन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे
मराठी विभाग
 साहित्य सहकार आयोजित

मु. श्री. कानडे आंतरमहाविद्यालयीन नाट्य समीक्षा लेखन स्पर्धा
नाटकप्रेमींसाठी एक खास संधी!

नाटकं पाहिली असतील अनेक... पण समीक्षा? या वेळेस “माझे आवडते
नाटक” या विषयावर शब्दांनी रंग भरा! आपले विचार, निरीक्षणे आणि
नाट्यप्रेम व्यक्त करा!
 
लेखनाचे  नियम :
1. संपूर्ण लेखन स्वलिखित व मराठीत असावे.
2. वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे (केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता)
4. 'माझे आवडते नाटक' या विषयावर लिहावे. निवडलेले नाटक मराठीच असावे.
5. शब्दमयार्दा : ४००-५०० शब्द
6. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 

लेखन पाठवण्याबाबतचे नियम:
1. आपले लेखन दि. २७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत पाठवावे.
2. लेखन केवळ ईमेल माफर्तच स्विकारले जाईल.
3. ईमेलमधील Subject च्या ठिकाणी आपण सहभागी होत असलेल्या स्पधेर्चे योग्य नाव
टाकणे अनिवार्य आहे.
4. आपले लेखन टंकिलिखत करून PDF स्वरूपात ईमेलला 'Attachment' मध्ये जोडून
पाठवावे. फोटो पाठवू नये.
5. तसेच त्यासोबत आपले नाव, सहभागी होत असलेल्या स्पर्धेचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक,
वय, महाविद्यालयाचे नाव, वर्ग ही माहिती जोडावी.

नाट्य समीक्षा लेखनाचा नमुना आराखडा:
1. प्रस्तावना- नाटककार मािहती, शीषर्क
2. कथानक - थोडक्यात मध्यवर्ती कल्पना, उपकथानक इ.
3. पात्रचित्रण - मुख्य पात्र, त्यांचे स्वभावचित्रण
4. संवाद
5. वातावरणनिर्मीती
6. भाषाशैली - बोलीभाषा वापरली आहे का ? अलंकारिक भाषेचा वापर, इ.
7. शीर्षकाची समपर्कता
8. नाटक यशस्वी झाले का? त्याचे कारण.
9. प्रयोग किती झाले
10. मुख्य पात्रं आणि नट
11. नाटकावर चित्रपट बनला का? किती यशस्वी झाला?
12. नाटक आणि त्यावरील चित्रपट तुलनात्मक आढावा (साम्य आणि वेगळेपण)
13. समारोप
ईमेल : [email protected]

वरील स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क:
पूजा उंडे- ८०१०५७९४००
मिताली काळे- ८४८३०७५२६४