रंग आणि स्वभाव

युवा विवेक    10-Mar-2025
Total Views |


रंग आणि स्वभाव

 

रंग म्हटले की, आपल्यासमोर वेगवेगळे रंग येतात. इंद्रधनुष्यातील रंग देखील आपल्या समोर येतात. आपण जन्माला आल्यापासून म्हणजे जेव्हापासून आपल्याला रंग समजायला लागले तेव्हापासून हे वेगवेगळे रंग आपल्या कोणाचे ना कोणाचे आवडते असतात. परंतु मला या विविध रंगांकडे पाहिल्यावर असे वाटते की, हे रंग त्यांच्या छटा हे व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये दर्शवितात. उदाहरणार्थ-

पांढऱ्या रंगाचा विचार केला तर त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्या डोळ्यांना शांत वाटते. त्यामुळे हा रंग एखाद्या शांत स्वभावाच्या व्यक्तीला साजेसा आहे.

तसेच तांबडा रंग पाहिला तर गतिमान, तीव्र इच्छा,उत्साही व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तीला हा रंग योग्य वाटतो.

हिरवा रंग हा हट्टी असणाऱ्या व्यक्तींना योग्य आहे असे मला वाटते.

पिवळा रंग हा आनंद व उत्साहवर्धक आहे असे त्याच्याकडे बघून जाणवते. ज्या व्यक्ती सतत आनंदी असतात किंवा ज्यांच्यात आनंदाची निर्मिती करण्याची प्रवृत्ती असते त्यांना हा रंग अगदी साजेसा आहे योग्य आहे.

लाल रंग म्हटले की, एखादी रागीट, चिडकी, संतापी व्यक्ती समोर येते. आपण म्हणतो ना अरे रागावून रागावून अगदी लाल बुंद झाल्यास तसे काहीसे मला या गडद लाल रंगाकडे पाहून वाटते.

असे बरेच रंग सांगता येतील त्याला जोडून माणसांचे स्वभावही कदाचित जुळतील. हा जरी निरीक्षणाचा एक भाग झाला तरी व्यक्ती तितक्या प्रकृती त्याचप्रमाणे हे जे अनेक रंग आहेत तसेच अनेक स्वभावाची माणसेही आहेत.

जर हे रंग नसतील तर सर्वत्र काळोखच दिसेल. त्याचप्रमाणे माणसांच्या स्वभावामध्ये वेगळेपणा नसेल तर एकाचा स्वभावाच्या माणसांना एकमेकांना भेटून त्यांच्याशी बोलून कंटाळा येईल. हा गमतीचा भाग झाला. परंतु या रंगाच्या व्हेरिएशन बरोबरच माणसांच्या स्वभावाचे व्हेरिएशनही परफेक्ट मॅच आहे.



     - नेहा कुलकर्णी जोशी