Primary tabs

एड्स समजून घेताना...

share on:

आज १ डिसेंबर, 'जागतिक एड्स प्रतिबंधक दिवस'. त्यानिमित्ताने एच.आय.व्ही. एड्स बद्दल सविस्तर जाणून घेऊ या...

'एड्स' हा वर्तमान काळातील गंभीर आजारांपैकी एक आजार आहे. खर तर हा आजार नसून तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही एक स्थिती आहे. अजूनही एड्स पूर्णपणे बरा होईल असे औषध उपलब्ध नसल्याने त्यावर संशोधन सुरुच आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल अनेक गैरसमज आणि भीती देखील आहे.

एच.आय.व्ही. आणि एड्स यामध्ये बराच फरक आहे. 'एच.आय.व्ही.' म्हणजे 'ह्युमन इम्युनोडिफीशियन्सी व्हायरस'. तर 'एड्स' म्हणजे 'अक्वायर्ड इम्यूनोडेफिशियन्सी सिंड्रोम'. एच.आय.व्ही. हा विषाणू मानवाची रोग प्रतिकारक शक्ती कमी करतो. एच.आय.व्ही. म्हणजे तुम्हाला फक्त त्या विषाणूची लागण झालेली असून, वेळेत यावर उपचार घेतले, तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. पण वेळीच उपचार घेतले नाहीत, तर एच.आय.व्ही.च्या विषाणूंचे प्रमाण वाढून हा आजार दुसऱ्या स्टेजला पोहोचतो आणि तुम्हाला एड्स होऊ शकतो. थोडक्यात एड्स म्हणजे अनेक रोगांचा समूहच असतो. एड्स झालेल्या लोकांना इतर संसर्गजन्य रोगांची लागण ही लवकर होते.

एच.आय.व्ही. आणि एड्स बद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. हा संसर्गजन्य रोग नसून, एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीसोबत राहिल्याने, त्याच्यासोबत वेळ घालवल्याने किंवा जेवण केल्याने याचा संसर्ग होत नाही. त्यामुळे एच.आय.व्ही. एड्स बाधित लोकांना दूर न करता त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागले पाहिजे. आणि या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी हा आजार होण्यामागची कारणे जाणून घेतली पाहिजेत.

एच.आय.व्ही. एड्स होण्यामागची महत्त्वाची चार कारणे आहेत.

१. वापरलेल्या सुईच्या पुनर्वापरातून एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते.

२. एच.आय.व्ही. बाधित आईच्या गर्भाशयातून बाळाला लागण होऊ शकते.

३. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीचे रक्त निरोगी व्यक्तीस दिल्यास लागण होऊ शकते.

४. तसेच असुरक्षित शरीरसंबंधातून एच.आय.व्ही. एड्स होऊ शकतो.

'नॅॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम' आणि 'यूएनएड्स' यांच्यानुसार भारतात ८० ते ८५ टक्के संसर्ग हा असुरक्षित विषमलैंगिक संबंधातून पसरत आहे. एड्सवर पूर्णपणे औषध उपलब्ध नसले तरीही, ठराविक औषध-उपचार घेवून व्यक्ती बरेच दिवस चांगले आयुष्य जगू शकते. सामाज भान म्हणून आणि आपल्या माणसांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून सर्वांनी एक 'एच.आय.व्ही.'ची टेस्ट करून घेतली तर वेळेत उपचार घेता येतील आणि या आजारापासून लांब राहता येईल. तसेही एच.आय.व्ही. चे संसर्गापासून एड्समध्ये रुपांतर होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही जास्त काळ लागू शकतो. त्यामुळे सध्यातरी यावर जागरूकता हा एकच उपाय होऊ शकतो.

सरकारी दवाखान्यात या आजारावर मोफत उपचार केले जातात. शिवाय अशा लोकांची माहिती देखील गोपनीय ठेवली जाते. तरी सर्वसामान्य लोकांनी कसलाही संकोच न बाळगता आपल्या सुरक्षेसाठी 'एच.आय.व्ही.'ची टेस्ट करून घ्यायला हवी.

- ज्योती बागल 

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response