दिग्दर्शक - ४

युवा विवेक    22-Oct-2021   
Total Views |

दिग्दर्शक - ४


director_1  H x 

संजय भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट ! अत्यंत सावेंदनशीलतेने हाताळलेली एक नाजूक कलाकृतीच ! माझा एक मित्र मला नेहमी म्हणतो, ' कलाकारांकडून काम करून घेतो, तोच खरा दिग्दर्शक.' काही ठिकाणी अभिनय इतक्या सखोलतेने झालेला असतो, की बघणाऱ्याचे डोळे आणि मनसुद्धा वाह-वाह करतं. मराठी दिग्दर्शकांमध्ये स्मिताताईंचा 'चौकट राजा' अभिनयाच्या बाबतीत आजही शिखरावर आहे. अभिनेत्याला नवरसांचा अभ्यास लागतो, हावभाव बोलके डोळे लागतात. पण दिग्दर्शकाला हे सगळं वापरून घेणं गरजेचं आहे. अभिनेता हा एकच पात्र करत असतो, पण दिग्दर्शकाला चित्रपटातील सगळी पात्र आली पाहिजे. प्रत्येक पात्राचा परिचय जमला पाहिजे. प्रत्येक पात्राची सुरवात आणि शेवटी जमला पाहिजे. पात्र आणि दिग्दर्शकाचं नातं काही वेगळं असतं. एक काल्पनिक पात्र जन्माला घालायचं, त्याची तेवढ्यापूर्ती कुंडली लिहायची, त्याच्याभवती कथा बांधायची आणि यशस्वी करून दाखवायची. दिग्दर्शकाने तयार केलेले सिनेमे आपण लक्षात ठेवतोय, तसेच काही दिग्दर्शकांनी जन्माला घातलेले पात्रसुद्धा अजरामर आहेत.

प्रत्येक दिग्दर्शक ओळखला जातोय तो त्याच्या चित्रपट बनवण्याच्या शैलीमुळे. चित्रपटाचा बाज कोणताही असो, कथा, पटकथा, संवाद, गाणी, संगीत, छायाचित्रीकरण पासून ते लोकेशन, रंगभूषा, वेशभूषा, इथपर्यंत सगळं काही Near By To Perfect असणारे दिग्दर्शक सुद्धा आहेत. अगदी साध्या कथेला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणारे सुद्धा आहेत...! चित्रपटसृष्टीत येणाऱ्या अधिकांश लोकांना दिग्दर्शक बनायचं असतं. मी पाहिलेले यातले काही नमुने खूप इरसाल होते. दिगदर्शकाचं नेमकं काय काम असतं, त्याला काय अभ्यास लागतो, तो कुठून करायचा ? याचे जराही ज्ञान नसताना हे धाडसी पाऊल ते उचलतात. एका दिग्दर्शकाने काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे.

१. चित्रपटाचा व्यवसाय हा ९०% दिग्दर्शकाच्या Performance वर अवलंबून असतो. त्यामुळे कथा, संगीत, Casting ,छायाचित्रण या बाबतीत सखोल ज्ञान असणं.

२. कालानुरूप बदलत जाणारे trends आणि प्रेक्षकांचे मुड्स चेक करणं.

३. Box-Office वर चालणारी Star Cast प्लॅन करणं. Budget अभावी ते शक्य नसेल , तर कथा-पटकथा, संगीत तितकं प्रभावी असावं.

४. आपण चित्रपट नेमका कुणासाठी बनवतो आहोत, याची माहिती असणं. त्यालाच आपण Target Audience म्हणतो. विशिष्टता जर सर्व- समावेशक असली, तरी Defined असावी. Marketting आणि Advertisements ला सोपं जातं.

५. अभिनेते निवडताना त्यांचासुद्धा प्रेक्षकवर्ग अपल्यात जोडला जातो. अभिनेता कोणत्या भागातला, बोलीतला किंवा जिल्यातला आहे यावर अभ्यास करणं. याचा काही विशेष फरक पडत नाही, पण सकारात्मक विचार आपण करू शकतो.

५. संगीताची थोडी जाण असावी. आपण ऐकतोय, तेच आपण अमलात आणतोय. आपल्याला आवडणारं आजच्या ट्रेंडनुसार आहे का, हे पडताळून पहाणं. नसल्यास, तसे नवीन प्रयोग आणि त्याचे परिणामांचा विचार करणं.

......

दिग्दर्शक आणि त्याची टीम म्हणजे चित्रपटाची पूर्ण बागडोर सभाळणारी टोळी असते. प्रामुख्याने १ दिग्दर्शक , त्याला सहायक म्हणून १ सहायक दिग्दर्शक ( Associate Director ) आणि ४ किंवा ५ Assistant Directors असावेत. त्यात Associate Director चं काम म्हणजे

१. Frame to frame Live Monitoring.

२. Assistant Directors च्या कामाचा आढावा घेणे.

३. प्रत्येक Scene व्यवस्थित झाला आहे का हे पडताळून पहाणं.

Associate Director ला Camera चं ज्ञान असणं गरजेचं आहे. जिथें दिग्दर्शक नवीन आहे, तिथे बरीचशी जवाबदारी Associate Director वर येते. त्यामुळे त्याला Camera , संकलन आणि तांत्रिक बाबी जमल्या पाहिजे.

Assistant Director team -

४ किंवा ५ जणांची ही टीम खूप Critical असते. दिग्दर्शनात जाण्याआधी किमान दोन-तीन वर्ष Assistant Director म्हणून काम केलं पाहिजे. चित्रपटाच्या सगळ्याच पैलुतुन ही टीम जात असते. एका चित्रपटात साधारण ३ पासून ५ assistant directors हवेतच. त्यांना मिळणारं profile काहीसं विस्कळीत असू शकतं. पण ही टीम खुप भक्कम आणि Trained हवी.

१. Assistant Director १ - Artist Co-Ordinator

२. Assistant Director - २ - Camera , Sound and Editting . ( Clap and Scene Co-Ordinator )

३. Assistant Director -३ - Costume , Arts and Make-Up Co-ordinator.

४. Assistant Director - Female Artist Co-Ordinator

ही चार ते पाच जणांची टीम पूर्ण चित्रपट सुप्तपणे आपल्या खांद्यावर घेत असते. त्यांची एवढी नावं गाजत नाहीत. दिग्दर्शकाला मिळतो, इतका Glamour आणि Fame देखील यांना मिळत नाही. उलट चित्रपट एकदा पूर्ण झाला की ही टीम त्यातून बाजूला होते. मोठ्या अभिनेत्यांचे नखरे सहन करण्यापासून ते सेट वरच्या लहान-सहान गरजा पूर्वेपर्यंतची बरीचशी जबाबदारी यांच्याकडे असते. Camera , Sound पासून ते Lights आणि Property जमवा-जमव होईपर्यन्त सगळ्या process मधून ही टीम गेली असते. यांच्यात वाढ होऊ शकते. पण कमीतकमी इतके Assistant लागतात आणि Assistant Directory या सदरात प्रत्येकाला या बाबतीत लिहीन...!

अनुराग