यशापर्यंत पोहोचण्याचा एक नवीन मार्ग

युवा विवेक    22-Mar-2021
Total Views |

success_1  H x
 
 
इमेज कन्सल्टिंग -प्रतिमा सल्लागार
जग वेगाने पुढे जात आहे व आपण आभासी जगात इतके गुंतलेले आहोत कि प्रत्यक्षात आपण आपली खरी प्रतिमा शोधण्याचा प्रयत्नही करीत नाही व त्यामुळे आपण स्वतः कसे दिसतो तसेच करीत असलेला उद्योग किंवा काम या करिता आपली वेशभूषा व केशरचना शोभून दिसते का? याचा साधा विचारही आपण कधी करीत नाही त्यामुळे जगासमोर आपण आपली योग्यप्रकारे ओळख करून देण्याकरिता प्रतिमा सल्लागाराची मदत घेणे जरुरीचे झाले आहे. आजच्या या वेगवान जगात व मिनिटामिनिटाच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता स्वतः बद्दल आत्मविश्वास निर्माण करून आपल्या व्यवसाय वृद्धी किंवा कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे वेशभूषा करणे फारच गरजेचे आहे ,प्रतिमा सल्लागार आपल्याला योग्यप्रकारचे कपडे निवडण्याकरिता आपले विश्लेषण करून आपली वयक्तीक रंगसंगती कोणती आहे त्यावरून आपण कशा प्रकारचे व कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत याबाबत मदत करतात,तसेच त्या वेषभूषेसोबत कोणकोणत्या इतर गोष्टी म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला काय शोभून दिसेल याबद्दल मार्गदर्शन करतात त्याची आपण माहिती करून घेतली पाहिजे.कोणता मेकअप आपल्याला उपयुक्त ठरेल तसेच त्यातील बारकावे समजावून सांगतात त्यामुळे आपले व्यकितमत्व चारचौघात उठून दिसण्यासाठी मदत होते कार्पोरेट जगातील शिष्ठाचार मग तो ऑफिसमधील असो कि जेवणाच्या टेबलावरील याबद्दलही मार्गदर्शन प्रतिमा सल्लागार करतात त्याच बरोबर कपडे खरेदीसाठी आपल्यासोबत येऊन नेमके काय शोभून दिसेल याची माहिती देतात त्यामुळे आपण त्यांची मदत घेणे फायद्याचे ठरते. प्रतिमा सल्लागार आपल्या वॉर्डरोबचंही नियोजन कसे करावयाचे याबद्दलच्यया वेगवेगळ्या युक्त्या सांगून त्यातून रंगसंगती चा वापर कसा करावा हेही सांगतात आपल्या वैयक्तीक शैलीचे मूल्यांकन करून आपली व्यासायिक व वयक्तिक जीवनात कायमची छाप पडण्यास मदत करतात कारण वेगाने जाणाऱ्या जगात आपली वेगळी छापच आपल्याला यशाकडे घेऊन जाण्यास उपयुक्त ठरू शकते. धकाधकीच्या जीवनात आपण आपल्याकडे लक्ष देत नसल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्या व्यासवायावर होऊ शकतो त्यामुळे प्रतिमा सल्लागाराची मदत योग्यवेळी घेणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे
आपण जर का गृहिणी असाल किंवा एखादी व्यक्ती काही काम जरी करीत नसेल तरीही आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राहताना त्यांची जीवनशैली व त्यांची समाजात असलेली पत सांभाळताना आपली प्रतिमाही व्यवस्थित केली पाहिजे जेणेकरून त्या राहणीमानाचा फायदा इतरांना होईल आपल्या वयोमानानुसार योग्य प्रकारचे पोशाख निवडणे जे आपल्याला शोभून दिसतील व आपल्या कुटुंबातील सदस्यांना आवडतील हे पाहणेही तेवढेच महत्वाचे आहे त्याकरिताहि प्रतिमा सल्लागार आपलयाला मदत करतात आपण ज्या कामात स्वतःला गुंतवून ठेवतो त्या कामाचा आपल्यावर व आपल्या जीवनशैलीवर फारच प्रभाव असतो व त्यानुरूप आपली प्रतिमा योग्यरितीने जगासमोर आणणे , सुंदर व कलात्मक दिसणे हे प्रत्येकाने केले पाहिजे व त्या करिता आपण प्रतिमा सल्लागाराची मदत घेणे हि आता काळाची गरज बनली आहे.
केतकी वायकर हि इमेज कन्सल्टिंग व सॉफ्ट स्किल ट्रैनिंग शेत्रात गेली पाच वर्षे काम करीत असून समाजातील वेगवेळ्या लोकांना त्यात गृहिणीपासून प्रथितयश मॉडेल व उद्योगहि आहेत, त्यांच्या ऑफिसातील स्टाफसाठी वेगवेगळ्या विषयावरील ट्रैनिंग,व्यक्तीमत्व विकास शिबीर,शिष्ठाचार या सारख्या गोष्टीमुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी फायदा झाला आहे.
केतकी वायकर