आमच्याविषयी

युवा विवेक    03-Jun-2021
Total Views |
 
yuva_1  H x W:
आपला समाज विवेकी व्हावा, यासाठी प्रत्येकाने विवेकाने विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका
असते ती महाविद्यालयीन तरुणांची. कारण याच वयात त्यांची स्वतःची मतं तयार होत असतात. स्वतःच्या आणि
इतरांच्याही अस्तित्वाविषयी असंख्य प्रश्न त्यांना पडत असतात. ही पिढी त्या प्रश्नांचा वेगवेगळ्या अंगांनी विचार
करते. हीच मते, प्रश्न, विचार, भावना फक्त डोक्यात न राहता, प्रत्यक्षात उतरणं गरजेचं असतं. त्यासाठी माध्यम
कोणतंही असो, व्यक्त होणं महत्त्वाचं. हाच उद्देश समोर ठेवून विवेकाने विचार करणाऱ्या आणि समाजभान
जपणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीसाठी आहे हे युवाविवेक व्यासपीठ!
 
तंत्रज्ञानाचं बदलतं स्वरूप आणि तरुणाईचा इंटरनेटकडे वाढता कल लक्षात घेऊनच ‘युवाविवेक’ या वेब पोर्टलवर
विविध विषयांवरील माहितीपर लेख जसे की, आरोग्य, कौशल्य, तंत्रज्ञान, राजनीती, मनोरंजन, वार्ता, मुलाखती,
Audio-Video Clips, Photo Features या सगळ्याचा समावेश केला आहे.
 
थोडक्यात सांगायचं तर ‘तरुणांना व्यक्त होण्यासाठी, तरुणांनी, तरुणांच्या सहभागानं उभारलेलं हक्काचं व्यासपीठ
म्हणजे आपलं युवाविवेक!
 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो सहभागी होण्यासाठी आम्हांला Whats App किंवा E-mail करा!
- Whats App No. 7045781685