जीवनावश्यक घटक - भाग १

युवा विवेक    01-Oct-2022
Total Views |

jivanavashyak ghataka - bhaag 1
 
 
 
जीवनावश्यक घटक - भाग १  

नमस्कार मित्रांनो! मागच्या भागात आपण menopause हा विषय संपवला आहे. या भागापासून आपण एक नवी मालिका सुरू करू. जीवनावश्यक घटक आहारातून कसे घ्याल याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. घटकांमध्ये हिमोग्लोबिन, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम, इतर मिनरल यांचा समावेश होतो. एकेक करून आपण प्रत्येक घटकाचे शरीरातील कार्य, त्याच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरची उपाययोजना जाणून घेऊ.

 

आज पहिला घटक हिमोग्लोबिन बद्दल अधिक माहिती घेऊया. हा घटक यासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रक्त किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर व्यक्ती ऍनिमिया या रोगाने बाधित होऊ शकते.

 

हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणे
 
१.  सतत थकवा जाणवणे हे हिमोग्लोबिन कमी असण्याचे प्राथमिक लक्षण आहे. व्यक्ती लहानसहान काम करून थकते.
२. वारंवार धाप लागणे हे सुद्धा हिमोग्लोबिनची कमतरता दर्शवते. अशा व्यक्तींना कोणतेही थकवणारे काम न करताच धाप लागू लागते आणि पुन्हा नॉर्मल होण्यास अर्धा तास लागू शकतो. 
३.   दिवसभर झोप येणे हे तिसरे आणि महत्त्वाचे लक्षण आहे ज्यावरून लक्षात येते की, व्यक्तीचे हिमोग्लोबिन कमी झालेले असू शकते. रात्रीची झोप व्यवस्थित पूर्ण झाली तरीही व्यक्तीला दिवसभर झोप येत राहते
 
 
हिमोग्लोबिनचे शरीरातील कार्य पुढीलप्रमाणे आहे :  
 
आपण श्र्वासावाटे जो ऑक्सीजन फुप्फुसात घेतो तो फुप्फुसात प्रवेश केल्यानंतर फुप्फुसात असणाऱ्या सर्वात लहान आकाराच्या bronchioles मधून रक्तात मिसळतो. रक्तातील हिमोग्लोबिनचे या प्राणवायू सोबत संयोग होऊन oxy hemoglobin मध्ये रुपांतर होते. शरीरात सर्व भागात हे oxy hemoglobin पोहोचते. प्रत्येक अवयवाला प्राणवायूचा पुरवठा केल्यानंतर पुन्हा एकदा oxy हिमोग्लोबिनचे हिमोग्लोबिनमध्ये रूपांतर होते आणि पुन्हा नव्या प्राणवायू सोबत संयुग करण्यास ते सज्ज होते. जेव्हा रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा शरीराला प्राणवायूचा योग्य प्रमाणात पुरवठा न होऊ शकल्यामुळे व्यक्तीला सतत थकवा येणे, धाप लागणे अशा समस्या जाणवतात.

हिमोग्लोबिन हे लोह या घटकाने तयार झालेले असते. त्यामुळे रक्तात लोह पातळी कमी झालेली असेल तरीही हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.

हिमोग्लोबिन नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठी आहारात काय घ्यावे हे पाहू

१. काळे खजूर किंवा काळया मनुका : रोजच्या रोज चार ते पाच काळे खजूर किंवा सात आठ भिजवलेल्या काळया मनुका संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून खाव्यात
 
२. भाजलेले शेंगदाणे आणि गूळ : शेंगदाणे भाजून घेऊन त्यात वितळलेला गूळ टाकून चिक्की सारखे मिश्रण करून ठेवू शकतासाधारण पन्नास ग्रॅम मिश्रण रोज संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये खावे. या उपायाने नुसते हिमोग्लोबिन नाही तर हाडांची घनता सुद्धा वाढण्यास मदत होते
 
. लोहयुक्त फळे आणि भाज्या : सफरचंद आणि हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक यांचे सेवन आठवड्यातून kimn चार वेळा ठेवावे.
 
४. याशिवाय संतुलित आहार घ्यावा : रोजच्या आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचे प्रमाण योग्य राखावे. नियमितपणे व्यायाम करावा. प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम करावेत.

या चारही उपायांनी हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुढच्या भागात आणखी एखादा महत्त्वाचा घटक पाहू.

Till then stay healthy, be happy

 

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ