अंतराळ हाका

08 Dec 2022 10:26:00
 
antaral haka
 
 
 

अंतराळ हाका


ढगाळ झालेल्या हाका अडकुन पडल्यात अंतराळात

आणि इथे..

इथे नभाने स्वतःला असीम करुन ठेवलंय...

अजूनही ठरतचं नाहियेत त्याच्या

कुठल्याच सीमा ..

कसलंच कुंपण..

नि फाऊल बाउंडरीज

प्रश्न..

प्रश्नांची साखळी..

त्यांची आवर्तनंही संपायच काही नाव नाही

विचारांचा परीघ रुंदावतोय ?

आत्मकेंद्री होतोय?

आत्मकेंद्री की आत्मधिष्टित होतोय ?

केंद्र

केंद्रक

की केंद्रबिंदू

ठरू पाहतोय की

होऊ पाहतोय ?

अंतराळात साद घालून ठेवलीय !

बघू..

कशावर तरी आदळेलच..

नि येईल परावर्तीत होउन परत आपल्यापर्यंत..

तेंव्हाच कळतील..

पडलेल्या प्रश्नांची उत्तरे..

नि

संदर्भासहीत स्पष्टीकरणे !


तोपर्यंत अंतराळखुणा शोधणं,

अंतराळ हाका घालत राहणं आलंच!


अमिता पेठे पैठणकर

 
Powered By Sangraha 9.0