सक्तीचा मोनोपॉज

युवा विवेक    17-Sep-2022
Total Views |

sakticha menopause
 
 

नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो! पुन्हा एकदा दीप्ती कडून सर्वांना नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिले की, सक्तीचा menopause म्हणजे काय आणि तो कोणत्या परिस्थितीत येऊ शकतो. गर्भाशयाची शस्त्रक्रिया म्हणजेच hysterectomy करून गर्भाशय काढून टाकले की, स्त्रीचा मासिक पाळीचा त्रास आपोआप थांबतो. त्यामुळे अनियमित आणि गंभीर स्वरूपाचा रक्तस्त्राव, गर्भाशयात असंख्य लहान अकराच्या किंवा एकदोन मोठ्या आकाराच्या गाठी तयार होणे, अशा परिस्थितीत डॉक्टर्स गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देतात. गर्भाशय काढून टाकल्यावर सर्व त्रास थांबतात. त्यामुळे स्त्रिया सुद्धा अशा सर्जरीसाठी लगेच तयार होतात. मात्र खरंच ही सर्जरी निर्धोक आहे का?

 

आपण मुद्देसूद पद्धतीने पाहू...
 
 
१. Hysterectomy ही मेजर सर्जरी प्रकारात मोडते. शरीरातील कोणत्याही अवयवाची मोठी सर्जरी करताना जे काही धोके संभवतात, ते याही सर्जरी दरम्यान संभवतात. म्हणजेच सर्जरी दरम्यान आणि नंतर रक्त चढवावे लागू शकते. सर्जरी दरम्यान काही गुंतागुंत होऊ शकते.  
२. या सर्जरी नंतर स्त्रीला पूर्णपणे recover होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. टाके भरून, जखम पूर्ण भरून निघण्यासाठी किमान दोन ते जास्तीत जास्त सहा आठवडे लागू शकतात. या कालावधीत स्त्रीने स्वतःची नीट काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. तिला पूर्ण विश्रांतीची गरज असते. 
३. या सर्जरी नंतर स्त्रिच्या metabolism वर परिणाम होऊन त्याची गती मंदावते आणि त्यामुळे पचनक्रिया बिघडून अन्नाचे फॅट्स मध्ये रुपांतर वाढत जाऊन वजन खूप वाढू लागते. जे काही केल्या कमी होत नाही.४.
४. या सर्जरी नंतर शरीरातील स्त्री हॉर्मोन्सच्या पातळीत कमालीची फेरफार होते कारण गर्भाशय अचानक गायब होते! मेंदूला हा एक प्रकारचा धक्काच असतो. त्यामुळे हॉर्मोन्स बिघडतात आणि स्त्रीला प्रचंड प्रमाणात मूड स्विंग जाणवू लागतात. अचानक चिडणे, अचानक रडणे, निराशा येणे अशी लक्षणे वारंवार दिसू लागतात. कधीकधी ही लक्षणे वाढत गेल्यास स्त्री डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकते. 
५. या सर्जरीचे मानसिक परिणाम सुद्धा काही स्त्रियांमध्ये दिसतात. विशेषतः वय कमी असेल आणि मासिक पाळीच्या अतिरिक्त त्रासामुळे गर्भाशय काढून टाकावे लागल्यास, स्त्रीला आपल्यात काहीतरी कमतरता आहे असे वाटत राहते. आपल्या स्त्रीत्वाची कमतरता दोष आहे, असे तिला वाटत राहते. ती मनाने खचू लागते.
६.एखादीला मूल हवे असेल तर त्याची शक्यताच संपल्याने टी फार निराश होऊ शकते.

 

या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीही अनेक डॉक्टर्स गर्भाशयात गाठी असतील आणि स्त्रीचे वय चाळीशीच्या पुढे असेल तर सर्जरी करून गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देतात. याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, दुर्दैवाने अजूनही आपल्याकडे गर्भाशयाच्या गाठींवर अगदी ठोस अशी औषधे उपलब्ध नाहीत. औषधांनी तात्पुरते बरे नक्कीच वाटते, मात्र गेलेल्या गाठी पुन्हा येतील की नाही याची शाश्वती कुणीच डॉक्टर देऊ शकत नाही. याशिवाय जर एखाद्या स्त्रीला फारच गंभीर रक्तस्त्राव होत असेल आणि कोणत्याही उपायांनी असर होत नसेल, तर तिचा जीव वाचवण्यासाठी hysterectomy हा शेवटचा आणि एकमेव पर्याय उरतो.

 

थोडक्यात सांगायचे तर मेडिकल सायन्स आणखी प्रगत झाले आणि स्त्रिच्या मासिक पाळीशी निगडित समस्यांवर आणि आजारांवर आणखी उपयुक्त असे उपचार उपलब्ध झाले, तर भविष्यात ही सर्जरी करावी लागणार नाही.

 

मात्र भविष्यात काय आहे, हे आताच कुणी सांगू शकत नाही, त्यामुळे किमान सध्या तरी, जर डॉक्टरांनी हा एकमेव पर्याय आहे असे म्हटले तर त्याला स्विकारण्याशिवाय इतर पर्याय स्त्रीकडे राहत नाहीत…

पुढच्या भागात पुन्हा भेटू असाच एखादा उपयुक्त विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.

Stay healthy be happy.

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ