तू आणि मी

युवा कविता

युवा विवेक    16-Nov-2023   
Total Views |

तू आणि मी

तू ये असाच कधीतरी

एकांतातील सोबत म्हणून

तू ये असाच कधीतरी

काळोखातील आधार म्हणून

तू ये असाच केव्हातरी

आयुष्यभर साथ देण्यास

तू ये असाच केव्हातरी

कायमचा माझा होण्यास

तू ये निराळा अर्थ घेऊन

माझ्या भाबड्या आयुष्याचा

तू ये निराळा अर्थ बनून

माझ्या भाबड्या अस्तित्वाचा

तू सहजच ये आयुष्यात

जीवन अजून सुंदर करण्यास

तू सहजच ये आयुष्यात

जीवनाचा अर्थ समजावण्यास

तू ये तुला हवं तेव्हा

अचानक किंवा अलगद सुद्धा

तू ये तुला हवं तेव्हा

कायमचा किंवा क्षणिक सुद्धा

तू ये असे म्हणणे माझे

आर्जवाहुनी स्वप्न वाटते

तू ये असे म्हणणे माझे

हक्काचे कोणी असावे वाटते

तू आलास तर दोघे आपण

तुझ्या माझ्यासाठी जगू

तू आलास तर दोघे आपण

या जगास सुद्धा जिवंत बनवू

- मैत्रेयी