तिचे विश्व अन् खरे विश्व

युवा कविता

युवा विवेक    06-Nov-2023   
Total Views |


तिचे विश्व अन् खरे विश्व

तिच्या मनीच्या भाबड्या प्रश्नांस येथे उत्तरे मिळत नाहीत...... तिची साधीशी सुंदर स्वप्रे येथे सत्यात येत नाहीत.....

तिच्या अल्लड वेड्या मनाला येथे आसरा गवसत नाही..... तिच्या कोवळ्या अनामिक भावनांना येथे वाट मिळत नाही.....

तिच्या आगळ्या जीवनकला येथे फारश्या शोभत नाहीत

तिच्या कल्पना, तिचे विचार येथे चपखल बसत नाहीत...

तिचे जग, इथले जग फारसे काही जुळत नाही

तिचे रंग, जगाचा रंग फारसा एकरूप होतही नाही....

तिचे विश्व जगास नकोसे, तिला अन् हे विश्व नकोसे

आगळ्या वाटा तिला हव्याशा, त्या वाटांनाही सत्य नकोसे

रोजचा नवा खेळ तरीही येथेच ती खेळत राहते.......

आयुष्यकोडे खरे समजण्या येथल्यासारखे नाही ठिकाण दुजे....

- मैत्रेयी