Maintaining family nutrition in a busy life...

युवा विवेक    12-Dec-2023
Total Views |


Maintaining family nutrition in a busy life...

नमस्कार मित्रांनो, कसे आहात आज? आजचा विषय वरवर साधा वाटला तरी दैनंदिन आयुष्यासाठी गरजेचा आहे. आपण रोजच्या रोज जे अन्न खातो त्यानेच आपले शरीर पोसले जाते. त्यामुळे फक्त काही समस्या असतील तरच आहाराचा नीट विचार करण्यापेक्षा जर कोणतीही समस्या नसताना सुद्धा रोजचा आहार विचारपूर्वक तयार केला तर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्यांपासून आपण स्वतः ला शक्य तितके दूर ठेवू शकतो.

म्हणूनच आजचा लेख वेटगेन किंवा वेटलॉस साठी नसून, ज्यांना आपल्या कुटुंबातील सर्वांचेच पोषण सांभाळायचे आहे अशांसाठी आहे.

आजकाल सर्वच घरात स्त्री 24 तास उपलब्ध असतेच असे नाही. अनेक स्त्रिया नोकरी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडतात. कामाचे तास सुद्धा खूप वाढलेले आहेत, त्यामुळे साहजिकच घरी परतायला उशीर होतो. ज्या स्त्रिया वर्क फ्रॉम होम करतात त्याही अनेक तास त्या कामात अडकून पडलेल्या असतात. कुणी मान्य करो अथवा करो, पुरुष अजूनही स्वयंपाक करण्यात मदत करतातच असे नाही. घरात या कामासाठी पगार देऊन मदतनीस ठेवली/ ठेवला असेल तरी त्या व्यक्तीला आपण सांगू तोच स्वयंपाक ती करते. घरात वेगवेगळ्या वयाचे सदस्य असल्यावर प्रत्येकाच्या पोषण गरजा वेगवेगळ्या असतात. म्हणूनच बिझी वेळापत्रकात सर्वांचेच आरोग्य आणि पोषण सांभाळण्यासाठी काही गोष्टी सोप्या करून सांगते.

. भाज्या नेहमी मिक्स वापरा.

दोन वेळेला दोन वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी आजकाल वेळही नसतो, आणि इच्छाही! म्हणूनच मी हा सोपा पर्याय निवडते. Mixing साठी भाज्या निवडताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वांचा cooking time जवळपास सारखा हवा, आणि सर्वांचे रंग वेगवेगळे असावेत. वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांमध्ये वेगवेगळी पोषणतत्वे असतात.

उदाहरण...

कोबी, मटार, बटाटा

लाल भोपळा, कोबी, लाल सिमला मिरची

गवार, मका, गाजर

फरसबी, गाजर, मका

मूग, मटकी, छोटी चवळी

मोठी चवळी, काबुली चणे

असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करायचे.

. सर्व भाज्यांमध्ये टोमॅटो वापरा

टोमॅटो मध्ये खूप पोषणतत्वे असतात. अँटी ऑक्सिडंट म्हणून टोमॅटो उत्तम आहे. मात्र तो शक्य तितका कच्चा राहील याची काळजी घ्यायची. शक्यतो टोमॅटो फोडणीत टाकता, भाजी शिजत आली की पाच मिनिटे आधी टाकायचा आणि पाच मिनिटांनी गॅस बंद करायचा.

. तांदूळ भरपूर धुवून वापरा

कुकरमध्ये शिजवता भात साध्या भांड्यात जास्त पाणी टाकून शिजवणे आणि मग ते पाणी फेकून देणे प्रत्येकाला वेळेअभावी जमेलच असे नाही. जर भात कुकरमध्ये शिजवत असाल तर तांदूळ किमान तीन वेळा चांगला हाताने चोळून धुवा, बराचसा स्टार्च निघून जातो. (स्त्रियांसाठी खास टीप: हे पाणी सगळे फेकून देता एका बाउल मध्ये घेऊन फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड करा. स्वच्छ रुमाल किंवा disposable cotton मास्क वापरून ते पाणी चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावून ठेवा आणि दहा मिनिटांनी काढून टाका, चेहरा धुवु नका. Rice water हे कोरियन ब्युटी सिक्रेट आहे. ज्यांना व्हाईट डिस्चार्ज चा त्रास सतत होतो त्यांनी भात जाणीवपूर्वक भांड्यात जास्त पाणी टाकून शिजवा आणि ग्लासभर पाणी रात्री झोपताना प्या, त्रास हळूहळू कमी होईल)

. हेल्दी स्नॅक्स

चिवडा, फरसाण, टोस्ट, खारी, बटर, बिस्कीट अशा स्नॅकिंग पेक्षा फळे आणि ड्राय फ्रुट यांचा स्नॅक्स मध्ये वापर करा.

अशा काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही पूर्ण कुटुंबाचे पोषण सांभाळू शकता 

तर मग आवडला ना आजचा विषय? पुन्हा भेटू पुढच्या भागात अशाच एका विषयासह.

 

Till then stay healthy be happy

- Dipti Kabade

  Nutrition Consultant