घरोटा चालवता
घरोटा चालवता
तू दु:खही दळले
विठूवाचून आधार
दुजे कोणी न कळले
दु:ख पेलले असे की
नित राहीले लपून
खारे अश्रूही ठेवले
स्वत:पाशी तू जपून
तलवार कधी झाली
म्यान-शक्तिही दाविली
आत सोसण्याची वाट
कशी एकटी चालली
घर मोठे ओलांडून
जरी आकाश गाठले
चूल-मूल वार्यावर
कधी कधी न टाकले
सारी नाती सावरून
तुझ्यापाशी तू वेगळी
जात तुझी ग बाईची
सांग कोणाला कळली ?
~ अनीश जोशी.