राम काय आहे?
‘राम’ हा फक्त एक शब्द नाही.
राम ही एक ऊर्जा आहे.
राम एक प्रेरणा आहे.
राम म्हणजे स्वयंप्रेरणा आहे.
राम एक स्फूर्ती आहे.
राम म्हणजे अर्थपूर्णता आहे.
राम म्हणजे सार्थकता आहे.
राम कुठे आहे?
राम नाही असा कण नाही.
राम चराचरात आहे.
राम कणाकणात आहे.
राम सजीवात आहे तसा निर्जिवात आहे.
राम तुमच्या-माझ्या आत आहे.
तो आतला राम सतत सदाचार आणि विवेकाचा रस्ता दाखवत असतो.
तो रस्ता पाहता आणि त्या रस्त्याने जाता आलं पाहिजे.
राम जन्म घेत नसतो आणि मृत्युही पावत नसतो. फक्त तो आपल्या आत आहे, याची जाण जागृत ठेवली की आपणच राम होऊन जातो.
थोडक्यात...
जगण्यात राम नसेल; तर जगण्याला राम नाही!
- व्यंकटेश कल्याणकर