आई

12 Apr 2023 13:06:30

 
आई

 
शेवटी माझ्या समोर तिचा बांध फुटलाच

त्यावेळी तिच्या गर्भात मी पुन्हा एकदा वेटोळ्या

घेतोय असा मला भास झाला

तिला कसं समजावून सांगू स्वप्नं कशाला म्हणतात

ज्यांना तिने कधीच ठेचून मारले होते

तिला कसं समजावून सांगू की लोक घर का सोडतात

ती आजन्म आपल्या घराच्या शोधात चमला दिसली

दिवसभर माझ्या आजुबाजूला तिचं रेंगाळणं एखाद्याने बेघर होण्या इतकचं भयानक होतं

तिच्या गर्भा एवढं सुरक्षित, संथ, निर्मळ, निर्मम, बाहेरचं जग नाही हे तिला कसं समजावून सांगू

तिच्या घराची संकल्पना कोष्टकाच्या जाळ्यासारखी माझ्यामध्ये अडकलीये याची जाणीव कधीच नव्हती

-  सोमदत्त 
Powered By Sangraha 9.0