मी घेतले नाव तुझे ओठांवर जेव्हा,
लाजली का तू गाली अशी तेव्हा,
ओळखले मी भाव तुझ्या मनातला,
मी घेतले नाव तुझे ओठांवर जेव्हा...
आहे दडलेले मनात तुझ्या जणु काही,
शोध मला प्रीतीचा उरला जणु नाही,
भास नाही वाटला, वाटला ठोस विश्वास तुझा,
मी घेतले नाव तुझे ओठांवर जेव्हा...
घेऊनी तू लाज मनी सावरतेस स्वतः,
बोलुनी दे बंद नको शब्दास आता,
हलचल झाली, लागला ओठास शब्द तुझ्या,
मी घेतले नाव तुझे ओठांवर जेव्हा...
सजवू नवी दुनिया प्रेमाची आज इथे,
देईल ग्वाही जमलेली ही जनता इथे,
बघ बरसू लागल्या फुल कळ्या अंगावर तुझ्या,
मी घेतले नाव तुझे ओठांवर जेव्हा...