प्रेमात गुंतत असे मन माणसाचे
प्रेमातल्या विविधतेसह मैत्र होते
वारे तयात असतात सुखावणारे
त्याचा नकार असतो, मन जेथ छोटे
प्रेमात गान स्फुरते नवख्या फुलांचे
ओळीत सूर जुळती मग काळजाचे
बेभान ओढ असते झुलण्या झुल्यांची
होऊनि मुग्ध, हळवेपण शोधण्याची
आपापल्या कसरती सहजीवनाच्या
नाही कुणास चुकल्या रथ हाकताना
संगे मधाळ हसणे कळते जयांना
प्रेमात चिंब भिजती रथ चालताना
साकारते सरस मैफिल जीवनाची
प्रीतीतल्या अनुभवांतुन हिंडण्याची
भेटेल वावटळ त्यात कधी तुम्हाला
किंवा सुखात सजली लय भावनांची
- अजय कुलकर्णी