मी पुन्हा पुन्हा तुझ्यावर भाळते आहे,
फक्त तुला सांगण्याचे हल्ली मी टाळते आहे,
तुझ्याविना जगणे बिगणे आले त्यातच आता
उगाच श्वासांची माळ मी आता माळते आहे
आणि दिवसंदिवस इतकी वाढत आहे थंडी
आणि दिवसंदिवस इतकी वाढत आहे थंडी
मी आठवणींवर तुझ्या माझे हृदय जाळते आहे.