ती धुंद सावळी काया
जशी पावसाची सर
भिरभिरे ध्यानीमनी
आणि काळजात घर
तुझी मंजुळ पैंजणे
त्यात जीव वसे आता
माझे गोड झाले ओठ
गीत तुझे गाता गाता
तुझे हसणे गुलाबी
तुझा गुलाबीच गंध
तुझ्या शब्दामृतात गं
जीव आनंद आनंद
थांब कवितेत माझ्या
येना माझ्या तू कवेत
चिंब सर श्रावणाची
खेळ चांदण्यासवेत