अज्ञात....

युवा विवेक    27-Jul-2023
Total Views |

अज्ञात....
 
म्हणता येत नाही अंधार; अज्ञाताला
तसं प्रकाशही म्हणता येत नाही
आकारांचं निराकारत्व असतं का अज्ञात
की ज्ञातेपणाच्या गाभ्यात जे माऊच शकत नाही
आणि साक्षीभावाशिवाय दिसुच शकत नाही ते असतं अज्ञात
असतं का ते गुढ; विस्मयाने माखलेलं रहस्य
की असतं अगदी साधं; तुमच्या-आमच्या सारखं
ज्याला कळलं; त्याच्यासाठी काहीच अज्ञात नाही
कळलं नाही ज्याला; त्याच्यासाठीही नाहीच त्याचं अस्तित्व
शेवटी शुन्य आणि पूर्ण यात असतोच की फरक
अज्ञात....
 
 
- अनीश जोशी.