सूर्य

28 Jul 2023 16:05:51


सूर्य

सूर्यप्रभेच्या आगमनापूर्वी

पक्षी निनादतात नभी

आनंदितापैकी काही

गात असतील त्यालाही

प्रकाश पसरतो चोहीकडे

दिसू लागते डोळसांना

धन्यवादित असतील

कदाचित तेही त्याला

हुडहुडी घालवतो तो

पीकं फुलतात त्याच्यामुळे

उपकारितांपैकी समस्त

प्रेम करत असतील काही

त्याला धन्य वाटत असेल ?

त्याच्या जळण्याला अर्थ आहे

त्याच्या आत एक दवबिंदू

त्याच्यासोबत नष्ट होणारा

जो कोणालाच दिसत नाही

जो कोणीच पाहू शकला नाही

- सिद्धी

Powered By Sangraha 9.0