मोकळा श्वास मनात भरून घे
उडता येईल कधीतरी
आधी पंख तर जोडून घे |
उडावयाची स्वप्न उरी
बाळगलीस कितीतरी
उबदार वाटणारी काटेरी घरटी
सोडशील ना आतातरी?