धारदार ती शस्त्रधारी 
प्रेम, माया मायमाऊली, 
शब्दांनी खेळवते, शब्दांनीच भूलवते, 
तिच्याच सुरांवर झुलवते 
अन् तिच्याच तालावर डुलवते
हिंदवी स्वराज्याची शिवगर्जना मराठी 
ज्ञानोबा माऊलींची विश्वप्रार्थना मराठी 
संतांची, साधूंची रसाळवाणी मराठी 
साहित्यिकांच्या लेखणीची पटराणी मराठी
दुधात साखर मिसळेल अशी मराठी 
शहारून टाकेल अशी जहरी मराठी 
लखलखत्या मोत्यांचा दर्या मराठी 
सदोदित वाहती गोदा मराठी 
अभिमान मराठी, अभिजात मराठी !
 
सार्थकी वेदपाठक