ऑलस्टेट दिव्यांग शिष्यवृत्ती योजना

09 Oct 2025 17:16:25

ऑलस्टेट दिव्यांग शिष्यवृत्ती योजना 
विवेक व्यासपीठ आणि ऑलस्टेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने
🎓 “ऑलस्टेट दिव्यांग शिष्यवृत्ती योजना”🎓
सुरु करण्यात येत आहे.
ही योजना उच्च शिक्षण घेत असण्याऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे उद्दिष्ट:
👉🏻पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणास प्रोत्साहन देणे.
👉🏻प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास घडवणे
👉🏻दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे.
पात्रता निकष:
👉🏻किमान ४०% किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक.
👉🏻कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹३.५ लाखांपेक्षा कमी असावे.
👉🏻वय १६ ते ३० वर्षे.
👉🏻पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी
👉🏻१२ वी (किंवा शेवटच्या वार्षिक परीक्षेत) किमान ६०% गुण.
👉🏻पुणे शहरातील महाविद्यालयात प्रवेश असणे आवश्यक.
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑक्टोबर २०२५
(नोंदणीसाठी लिंक: https://forms.gle/kJmvYDaVhi6poH3B6 व QR कोड पोस्टरमध्ये दिलेला आहे).
आपण सर्वांना नम्र विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून पात्र व गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल.
संपर्क: ८६००९०६२९६ , ७७६९००४४००
Powered By Sangraha 9.0