तुला वाचताना तुझे शब्द ओठी
तुझे अर्थ, उच्चार, अक्षरे गोल मोठी
तुला वाचताना भान हरपून जाते
द्विजोक्त वाचा तुझे गुण गाते
दिसू लागते लावण्य तेज पूर्ती
तुला पाहताना सावरू तो कसा मी
न माझा उरे मी तुला पाहताना..
तुझे शब्द ओठी तुला वाचताना..
तुझे खोल डोळे, काजळांच्या किनारी
तुझे दाट केस, ओठ गुलाबी गुलाबी
काय वर्णू तुला मी, तुला पाहताना?
तुझे शब्द ओठी तुला वाचताना..