स्व. संजीवनी मराठे स्मृतिप्रीत्यर्थ कविता स्पर्धा

युवा विवेक    19-Aug-2025
Total Views |

स्व. संजीवनी मराठे स्मृतिप्रीत्यर्थ कविता स्पर्धा
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे
(स्थापना १९६५)
प्रति,                                                                                                                                                      दिनांक १५/०८/२०२५
मा. प्राचार्य, 
पुणे

विषय : साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री संजीवनी मराठे स्मृतिप्रीत्यर्थ कविता स्पर्धा
 
स. न.
 
         साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्व. संजीवनी मराठे स्मृतिप्रीत्यर्थ कविता स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. या वर्षीही या स्पर्धेला असाच प्रतिसाद मिळेल. असे वाटते. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. तरी आपल्या महाविद्यालयातून स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पाठवावे, ही विनंती सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या वर्षीही असाच प्रतिसाद मिळण्यासाठी आपल्याकडून सहकार्य मिळावे व आपण ते कराल, याची खात्री आहे. मराठीच्या संवर्धनासाठी आमचे छोटे छोटे प्रयत्न चालू असतात. त्यातील हा एक .
स्पर्धेचे नियम -
१. कविता स्वरचित असावी.
२. कविता जास्तीज जास्त वीस ओळीपेक्षा मोठी नसावी
३. स्पर्धेत कविता जास्तीत जास्त तीन मिनिटांत सादर करावी.
४. परीक्षकांसाठी कवितेच्या दोन प्रती सोबत आणाव्यात.
५. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
६. स्पर्धेसाठी वेळेवर उपस्थित राहावे.
बक्षिसे : प्रथम बक्षीस रक्कम रु. १०००/-, द्वितीय = रु.७५०/-, तृतीय = रु.५००/-
स्पर्धेची तारीख : गुरुवार २१ ऑगस्ट २०२५
स्पर्धेचे स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे
स्पर्धेची वेळ : दुपारी ४ वाजता
अधिक माहितीसाठी व रजिस्ट्रेशनसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
पल्लवी पाठक - ९८८१४९४५०२, श्रध्दा देशपांडे - ९१७२१४४११७
 
तरी या स्पर्धेस विद्यार्थी पाठवून सहकार्य करावे ही विनंती.
 
 
कार्यालयीन पत्ता : ५८० शनिवार पेठ, श्री समर्थ अपार्टमेंट, केसरी ऑफिस समोर, पुणे-४११०३० (महाराष्ट्र) मोबा. ९७६७५६६८००