Primary tabs

आठवणींच्या गर्तेत...

share on:

जसं एखादा पक्षी निळ्याशार पाण्यात
सूर मारत राहतो ना
तसं मी तुझ्या आठवणींच्या 
खोल गर्तेत 
परत परत जात राहतोय.
जेंव्हा बाहेर येतो तेंव्हा 
ओला चिंब होतो, मग
क्षणभरात
आपल्या संवादांच्या सूर्यप्रकाशाची
ऊब घेतो, आणि
परत त्या खोल गर्तेत जायला 
मोकळा होतो,
कधी तळ लागूच नये आणि
कधी वर येऊच नये,
तिथेच राहावं,
शांत, स्तब्ध, निर्मोही...तुझ्यासारखं!

- अनघ

yuvavivek@gmail.com

लेखक: 

No comment

Leave a Response