Test2
कस्तुरीरंगन समितीला तिसर्यांदा मुदतवाढ
नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर अखेरचा हात फिरवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कस्तुरीरंगन समितीला तिसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. इस्रोचे माजी प्रमुख कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती हा मसुदा ३० जूनमध्ये सादर करणार होती. आता समितीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.