Primary tabs

फाजील आत्मविश्वास!

share on:

विक्रम भागवत यांच्या करियर या लेखमालेतील हा पुढचा लेख 

फाजील आत्मविश्वास !

ह्याला अनाठायी विश्वास असे सुद्धा म्हणता येईल. कसा ओळखायचा हा फाजील विश्वास...? आणि कसा टाळायचा?

ह्यातला कसा ओळखायचा हा भाग खूप महत्वाचा आहे....

आपल्याकडे “मला माहित नाही...” हे उत्तर देणे खूप कमीपणाचे मानले जाते. मी एक उदाहरण देतो. माझ्या नोकरीच्या संदर्भात मी जर्मन लोकांबरोबर खूप काम केले आहे. मी एकदा सहज एका जर्मन सहकाऱ्याला विचारले, “अमुक एक गोष्ट तुला करता येईल” आणि त्याचे त्वरित उत्तर आले “नाही”. मी आश्चर्यचकित झालो पण ह्यात एक प्रामाणिकपणा होता. तो माझ्याकडे बघत म्हणाला “विक्रम हे उत्तर तुला अनपेक्षित असेल पण जर्मनीत आणि

युरोपमध्ये हे उत्तर तुला बऱ्याचदा ऐकायला मिळेल आणि त्यात खूप प्रामाणिकपणा असेल. आम्हाला लहानपणापासून हे आमच्या मनावर बिंबवल जातं, जे येतं तेच करा. जे येत नाही ते येतं असं खोटं सांगू नका पण मी भारतात आलो की आम्हाला आश्चर्य वाटत. तुम्ही सगळ्याला आम्ही विचारलं येतं? की “हो” उत्तर देता. आणि मग ते काम अंगावर घेऊन तुम्ही करीत नाही. तेंव्हा आम्हाला कळतंच की तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हणून हो म्हणता”

आपल्याबद्दल हे कटू सत्य ऐकण खूप काही शिकवून गेलं.

मला भाषण देता येत नाही आणि कोणी मला सांगितले तुला बोलायचे आहे तर मी स्टेजवर गेल्यावर उघडा पडणारच नं? मला क्रिकेट येत नाही पण तरीही मी हट्टाने संघात मला घ्यायला लावल्यावर, पहिला चेंडू खेळताना किंवा टाकताना, मी उघडा पडणारच न? अशी अनेक उदाहरण देता येतील. मराठीत एक सोप्पी म्हण आहे...”बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर”. गुणवत्ता अंगी नसूनसुद्धा ती आहे असे दाखवायचा प्रयत्न केला की विश्वास “फाजील”

होतो. हे विसरायचं नाही. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही. हे सांगायचा कमीपणा वाटू देऊ नका. नोकरीच्या मुलाखतीला माझ्यासमोर कोणी बसल की मी काही प्रश्नानंतर एक फसवा प्रश्न टाकायचो. एक सेकंदात ओळखता येतं, उत्तर सार्थ विश्वासावर आहे की फाजील विश्वासावर आधारलेलं आहे.

मग जेंव्हा विश्वास सार्थ आहे असं आढळतं तेंव्हा आपल्याबाद्द्लचा आदर इतरांच्या डोळ्यात दिसू लागतो आणि आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. एक विसरू नका सार्थ विश्वास हा नेहमीच नम्र असतो अनाठायी विश्वास हा नेहमी उग्र असतो कारण तो सतत घाबरलेला असतो. आपले अनाठायी असणे उघडे तर पडणार नाही ह्या भीतीने.

क्रमश: 

No comment

Leave a Response