Primary tabs

नातंं ....तुझं नि माझं

share on:

 

तुझी माझी साथ असु दे

वाऱ्याची ती झुळूक असू दे

वा पावसाची धार असू दे

सुखाची सकाळ असू दे

वा दुःखाचा अंधार असू दे

तुझी माझी साथ असू दे

 

किती येऊ दे वादळ वारे

ना डगमणार हा साथ प्रेमाचा 

किती टोचू दे ,काटेरी रस्ते

हा पाऊल न मागे पडणार

हा रस्ता आहे आपल्या ध्येयाचा

 हा रस्ता आहे

तुझ्या अन माझ्या साथीचा

 

अंधारी रात्र  संपल्यावर

प्रकाशाचे किरण येणार

हा विश्वास मनात असु दे

अन तुझी माझी .

प्रेमळ साथ  असू दे

 

 जगण्याला गरज श्वासाची

 तशी आहे मला गरज तुझी

 मी शरीर तर तू श्वास माझा

इतकी जीवलग साथ असू दे 

तुझी माझी साथ असू दे,

 

साथ असावी तर अशी

असे आपले उदाहरण असू दे

अन तुझी माझी

प्रेमळ साथ असू दे

साथ असू दे....

 

-कावेरी विशाल बहिरट 

No comment

Leave a Response