Primary tabs

गुणाकार ते वजाबाकी.. भीतीदायक प्रवास..

share on:
कोरोनाबद्दल आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक गोष्ट सांगितली. सध्या कोरोनाचा संसर्ग हा बेरीज करतोय. जर त्याने गुणाकाराचं गणित अवलंबलं तर मुंबई, महाराष्ट्रात खूप भयंकर परिस्थिती उद्भवेल. बेरजेचं गणित म्हणजे एक उदाहरण घ्या. आपल्या राज्यात दर २४ तासाला साधारण १५-१६ नवीन रुग्णांची भर पडतेय. हा नवीन रुग्ण वाढण्याचा आकडा सध्या याच क्रमांकाने वाढतोय. हे सध्या कमी प्रमाणात आहे, प्रसार इतका नाही म्हणून काही रुग्णांची रोज नव्याने वाढ होतेय, बेरीज होतेय. 
पण जर हा विषाणू तिसऱ्या टप्प्यात, म्हणजेच गुणाकाराच्या पातळीत पोहोचला तर गंभीर परिणाम होतील. म्हणजे असं की कोरोना हा विषाणू संपर्क वाढल्याने पसरतो, हे सर्वांनाच माहिती आहे. आपण जर शासनाचं, मुख्यमंत्र्यांचं, पंतप्रधानांचं ऐकलं नाही आणि जास्त लोकांच्या संपर्कात आलो तर हा धोका वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्यापैकी किमान प्रत्येकजण निदान रोज १० लोकांना भेटतो. म्हणजेच जर एखादा कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती दिवसात साधारणतः कमीत कमी  १० लोकांना भेटला तर त्याला धरून ११ लोकांना कदाचित कोरोनाची लागण होईल. जर ते १० जण असेच अजून १० लोकांना भेटले तर तो संसर्ग १० x १० = १०० लोकांपर्यंत पोहोचला. हाच आकडा जसं आपण लोकांच्या संपर्कात जास्त येऊ तसा वाढत जाईल. १०,१००, १०००, १००००, १०००००........ किती वाढेल याचा विचारच न केलेला बरा. तेव्हा या परिस्थितीत हा रोग आटोक्यात आणणं खूप कठीण जाईल.
पण जर आपण याच टप्प्यात म्हणजेच बेरजेच्या टप्प्यात कोरोनाला रोखलं, लोकांच्या संपर्कात आलो नाही, घराबाहेर पडलो नाही आणि स्वतः सोबतच सर्वांची काळजी घेतली तर लवकरच वजाबाकीचा टप्पा सुरू होईल आणि एकदा आपण वजाबाकी टप्प्यावर आलो तर कोरोना आटोक्यात यायला वेळ लागणार नाही. याला काही दिवस, काही आठवडे नक्कीच जातील पण आपल्याला एकत्र होऊन या संकटाचा सामना करावा लागेल. म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कृपया शासनाने, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा. काही दिवस, काही आठवडे संचारबंदीचं पालन करून कोरोनाला स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून आणि पर्यायाने समाजापासून दूर ठेवा.
 
- प्रथमेश श. तेंडुलकर
 
#कोरोना_हारेगा_इंडिया_जीतेगा
 
*हा मेसेज जास्तीतजास्त लोकांना पाठवूया आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊया..

No comment

Leave a Response