Primary tabs

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे! : भाग – ८

share on:

जर एखाद्या शेअरची शेअर बाजारातील किमंत १०० आहे व Earning Price of Share ही १० असेल, तर त्या कंपनीचा ‘पी/ई रेशो’ हा १० असेल. याचा अर्थ असा की, जर आपण १०० रुपये या शेअरमध्ये गुंतवले तर १०० रूपये परत मिळायला १० वर्षे लागतील! मग कशाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. या प्रश्नाचं उत्तर ‘Earning Price of Share’ मध्ये आहे. कारण जर कंपनी तिचा नक्त नफा (Net Profit) वाढवेल तर तिचा ‘पी/ई रेशो’ हा कमी असेल. म्हणजे जर कंपनीचा EPS पुढील वर्षी २० झाला तर पी/ई रेशो ५ होईल. म्हणून पी/ई रेशो पेक्षा Earning Price of Share हा रेशो महत्वाचा आहे.

या लेखात आपण रेशो अॅनालिसिस (Ratio Analysis) बद्दल जाणून घेऊ. Ratio Analysis करून आपल्याला कंपनीच्या एकूण Accounts बाबत कल्पना येते. Ratio Analysis करताना मुख्यत्वेकरून ५ महत्वाचे भाग असतात ते खालीलप्रमाणे :

1. Liqudity Ratios

2. Efficiency Ratios

3. Debt Ratios

4. Profitability Ratios

5. Market Ratios

आता आपण येथे महत्वाच्या अशा ६ रेशोबद्दल जाणून घेऊ.

 

१. पी/ई रेशो :

पी/ई रेशोचे सूत्र : ‘Market Price of Share / Earning Price of Share’

उदा. जर एखाद्या शेअरची शेअर बाजारातील किमंत १०० आहे व Earning Price of Share ही १० असेल, तर त्या कंपनीचा ‘पी/ई रेशो’ हा १० असेल. याचा अर्थ असा की, जर आपण १०० रुपये या शेअरमध्ये गुंतवले तर १०० रूपये परत मिळायला १० वर्षे लागतील! मग कशाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. या प्रश्नाचं उत्तर ‘Earning Price of Share’ मध्ये आहे. कारण जर कंपनी तिचा नक्त नफा (Net Profit) वाढवेल तर तिचा ‘पी/ई रेशो’ हा कमी असेल. म्हणजे जर कंपनीचा EPS पुढील वर्षी २० झाला तर पी/ई रेशो ५ होईल. म्हणून पी/ई रेशो पेक्षा Earning Price of Share हा रेशो महत्वाचा आहे.

२. Earning Price of Share (EPS) :

‘Earning Price of Share’ (EPS) चे सूत्र : ‘Net Profit / Total Number of Outstanding Shares’

जर आपण या लेखमालिकेतील यापूर्वीच्या भागातील ब्रिटानिया कंपनीचा तक्ता बघितला असेल तर EPS असा आहे : 2010 - 39.04, 2011 - 10, 2012 - 15, 2013 - 20, 2014 - 31, 2015 – 54. यावरून आपल्या लक्षात येतं की, ‘ब्रिटानिया’चा EPS हा २०११ ते २०१५ पर्यंत वाढता आहे. म्हणून ज्यांनी २०१२ आणि २०१३ या वर्षांत या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणुकीवर त्यांना तीन पट परतावा मिळाला असता.

३. Price to Growth Ratio (PEG Ratio) :

PE Ratio / Earnings Growth Rate म्हणजेच मागील १२ महिन्यातील EPS मधील वाढ किती आहे, हे काढून वरील सूत्रात ती टाकून PEG Ratio काढतात. जर उत्तर १ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो शेअर हा Undervalued आहे व जर हा रेशो १ पेक्षा जास्त असेल तर तो शेयर Overvalued आहे, हे लक्षात घ्यावं. मागील लेखात आपण Value Investing बद्दल वाचलं असेल तर त्या पद्धतीमध्ये या रेशोला खूप महत्व आहे.

४. Return On Equity Ratio :

‘Return On Equity Ratio’ चं : ‘Net Profit / Share Holder's Equity’

म्हणजेच कंपनी भागधारकांच्या भांडवलावर किती रुपये कमवून देते. जर हा रेशो १५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि दर वर्षी हा रेशो वाढत असेल तर अशी कंपनी सर्वात उत्तम मानली जाते.

५. Return on Capital Employed Ratio :

‘Return on Capital Employed Ratio’ चे सूत्र : ‘EBITDA / Total Capital Employed’

EBITDA म्हणजे Interest, Tax, Depreciation आणि Amortisation द्यायच्या आधी असलेला नफा. Total Capital Employed मध्ये Equity आणि Debt हे दोन्ही येते. म्हणजेच, कंपनी ही Equity आणि Debt या दोन्ही प्रकारच्या भांडवलावर किती रुपये कमवून देते. जर हा रेशो १५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि दर वर्षी हा रेशो वाढत असेल तर अशी कंपनी सर्वात उत्तम मानली जाते.

६. Debt To Equity Ratio :

‘Debt To Equity Ratio’ चे सूत्र : ‘Total Liabilities / Shareholder’s Equity’

जर येणारं उत्तर हे जर १ किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ती कंपनी गुंतवणूक करण्यायोग्य आहे, आणि जर येणारं उत्तर हे १ किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती कंपनी गुंतवणूक करण्यायोग्य नाही. परंतु, एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे, हा रेशो प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा असू शकतो. कारण ज्या क्षेत्राला कर्ज घ्यावे लागतं, त्या क्षेत्रासाठी हा रेशो १ पेक्षा जास्त असतो. अशी क्षेत्रं म्हणजे : १. Capital Goods, 2. NBFC (Non Banking Financial Institutions), 3 Real Estate.

 

आता विश्लेषणांनुसार ब्रिटानिया या कंपनीचं २०११ ते २०१५ या कालावधीतील Ratio Analysis Statement खाली दिलं आहे. तर या Ratio Analysis Statement चा अभ्यास आपण केला तर वर उल्लेखल्याप्रमाणे ‘ROE’ मध्ये प्रत्येक वर्षी वाढ दिसेल आणि Debt To Equity Ratio मध्ये प्रत्येक वर्षी घट दिसेल.

या Ratio Analysis चे आपण आपल्या अभ्यासाप्रमाणे Filter लावून आपण आपला एक Portfolio देखील बनवू शकतो. आता या पुढील लेखात आपण तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) या विषयासंबंधी माहिती घेऊ.

- अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

No comment

Leave a Response