Primary tabs

घरबसल्या गिरवा शेअर मार्केटची मुळाक्षरे! : भाग ९

share on:

मूलभूत विश्लेषण तसं बरंच अवघड आहे व तेही आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून करणं अधिकच अवघड आहे. दुसरीकडे, तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे त्या तुलनेनं पटकन आत्मसात करता येतं. तांत्रिक विश्लेषण करताना एक गोष्ट सारखी जाणवते की, Charts आपल्याशी जणू बोलत असतात, फक्त त्यांची भाषा आपल्याला समजावी लागते! यासाठी चांगलाच ‘होमवर्क’ करावा लागतो, त्यापासून काही सुटका नसते..

मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) या शेअर बाजाराच्या अभ्यासातील दोन मुख्य शाखा आहेत. मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) हे आपल्याला एखाद्या कंपनीचा शेअर का खरेदी किंवा विक्री करायचा ते सांगेल आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे एखाद्या कंपनीचा शेअर केव्हा खरेदी किंवा विक्री करायचा ते सांगेल. बऱ्याच जणांचा असा समज असतो की, तांत्रिक विश्लेषण हे फक्त अल्प मुदतीच्या व्यवहारांसाठीच वापरायचं असतं. परंतु, हे पूर्णतः खोटं आहे. तांत्रिक विश्लेषण हे अल्प मुदतीसाठी (Short Term) तसेच दीर्घ मुदतीसाठी (Long Term) देखील वापरता येतं. यापूर्वीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे मूलभूत विश्लेषण हा शेअर बाजाराचा गाभा आहे. परंतु, मूलभूत विश्लेषण करायला फार अवघड आहे व तेही आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून करणं अधिक अवघड आहे. दुसरीकडे, तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे मूलभूत विश्लेषणाच्या तुलनेनं पटकन आत्मसात करता येतं.

तांत्रिक विश्लेषण करतानाही आपण एकप्रकारे मूलभूत विश्लेषणाचाच अभ्यास करत असतो फक्त तो शेअरच्या भावाच्या (Share Price) एकूण चित्रावरून केला जातो इतकंच. ही एकूणच खूप मजेशीर गोष्ट आहे. तांत्रिक विश्लेषणामध्ये दोनच गोष्टींना महत्व आहे त्या म्हणजे शेअरचा भाव आणि त्या शेअरची होणारी खरेदी - विक्री (Traded Volume). अर्थशास्त्राचा मागणी आणि पुरवठा हा साधा-सोपा नियम इथे पाळला जातो. म्हणजे जर एखाद्या कंपनीच्या शेअरची मागणी (Buying Volume) वाढली तर त्या कंपनीच्या शेअरचा भाव वर जातो / वधारतो आणि जर त्या कंपनीच्या शेअरमध्ये ‘पुरवठा’ वाढला (Selling Volume) तर त्या कंपनीच्या शेअरचा भाव खाली जातो.

तांत्रिक विश्लेषणामध्ये तीन महत्वाचे नियम आहेत. त्या तीन नियमांवरच तांत्रिक विश्लेषण आधारलेलं आहे. ते नियम पुढील प्रमाणे :

1. Price moves in Trend

2. Price discounts everything

3. History repeats itself

आता हे सगळं नेमकं काय याबाबत थोडक्यात माहिती घेऊ.

1. Price moves in Trend :

 

शेअरचा भाव हा नेहमी तीन प्रकारचे कल (Trend) दाखवतो ते म्हणजे UP Trend (वरचा कल), Down Trend (खालचा कल) आणि Sideways Trend (एकसारखा कल). या तीन Trend मध्येच शेअरचा भाव खेळत राहतो. आपल्याला फक्त अल्प मुदत (Short Term), मध्यम मुदत (Medium Trend) आणि दीर्घ मुदत (Long Term Trend) या तीन कालावधीचे Trend ठरवावे लागतात.

2. Price discounts everything :

शेअरचा भाव हा प्रत्येक गोष्ट आधीच ‘Discount’ करतो. उदा., जर एखाद्या उत्तम कंपनीचा निकाल असेल तर तो निकाल येण्याअगोदर काही दिवस त्या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी व्हायला सुरुवात होते व शेअरचा भाव वर जायला लागतो आणि निकाल लागल्यानंतर विक्री होऊन शेअर खाली येतो. यालाच म्हणतात, Price dicounts everything.

3. History repeats itself :

शेअरचा भाव हा नेहमी वर-खाली होत असतो. या चढ-उतारामुळे काही ‘Price Patterns’ तयार होतात आणि या Price Patterns ची पुनरावृत्ती (Repetations) होत असते. या Price Patterns मुळे आपल्याला एकप्रकारे अंदाज करता येतो की, हा शेअर किती वर किंवा खाली जाऊ शकेल.

मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis) असो किंवा तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) असो, आपल्याला अभ्यास हा करावाच लागतो. तांत्रिक विश्लेषण करताना एक गोष्ट सारखी जाणवते की Charts आपल्याशी जणू बोलत असतात, फक्त त्यांची भाषा आपल्याला समजावी लागते! यासाठी चांगलाच ‘होमवर्क’ करावा लागतो, त्यापासून सुटका नसते. जर आपण या लेखमालिकेतील यापूर्वीच्या भागात सांगितल्याप्रमाणे मूलभूत विश्लेषणाद्वारे जर काही शेअर्स निश्चित करून त्यावर जर तांत्रिक विश्लेषण केलं तर आपल्या अभ्यासाला एकप्रकारे खूप वजन प्राप्त होतं. या अभ्यासाला शेअर बाजाराच्या विश्वात ‘Techno Funda Study’ असं म्हटलं जातं. तांत्रिक विश्लेषण हादेखील मूलभूत विश्लेषणाएवढाच मोठा विषय आहे त्यामुळे इथे त्याची अगदी संपूर्ण माहिती देणं शक्य नाही. परंतु, आपणापैकी कुणाला अधिक सविस्तर शिकण्याची इच्छा असल्यास जरूर मला संपर्क साधावा. आता यापुढील लेखात आपण सद्यस्थितीत शेअर बाजारात काय केले पाहिजे ते अभ्यासू..

- अमित पेंढारकर

(लेखक शेअर मार्केटचे अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार आहेत.)

No comment

Leave a Response