Primary tabs

वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे!

share on:

 

वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे
असं म्हणालास तूच, पण मग आमचा लाडका चाणक्यमधल्या धनानंदचा सेनापती, रूहदार, राणा चौधरी, राज बात्रा, चंपक बन्सल आणि असे अजून खूप असणारे अनेक जण तू आमच्यापासून जणू एका झटक्यात घेऊन गेलास.
इरफान, तू अप्रतिम अभिनेताच नाही तर एक चांगला माणूस पण होतास, आहेस आणि आमच्यासाठी कायमच असणार आहेस. तुझा सिनेजगतातला प्रवास तू एकट्याने केलास पण तुला त्या मोठ्या पडद्यावर बघून तो प्रवास आम्हीही अनुभवला. "सलाम बॉम्बे" म्हणत तू बॉम्बेमध्ये नाही, तर आमच्या सगळ्यांच्या मनात "ब्लॉक बस्टर" प्रवेश केलास. त्या पुढे आम्ही तुला साधारण ५० चित्रपटांमध्ये बघितलं आणि तेवढंच नाही, तर जंगल बुकमध्ये तुझ्या आवाजाने भालूच्या पात्राला तू अजरामर केलंस. खरं तर तू साधा होतास, पण सर्वसामान्य नाही. तुझ्यात दडलेली कला, सर्व गोष्टींप्रतीचा आदर, तुझे विचार हे तुझ्या वागण्यातून दिसायचे.
छोट्या पडद्यावर काम सुरू केलेस, मोठ्या पडद्यावरून फिल्म फेअर मिळवलंस, कलाक्षेत्रात तुझ्या कामामुळे तू
"पद्मश्री" मिळवून दाखवलास.
फक्त सिरियल नाही, तर सगळी चित्रपटसृष्टी गाजवलीस
बाॅलीवुडच नाही तर हाॅलीवुडमध्ये पण, तू तुझी एक वेगळी ओळख मिळवलीस.

"हिंदी मीडियम"मध्ये आवडलास तू सगळ्यांना, "पिकू"मध्ये तू उत्तम रोल केलास,
"एंग्रजी मीडियम" हा पिक्चर देऊन, तू इतक्यातच निघून गेलास?

'तलवार' असो किंवा 'करीब करीब सिंगल' सगळे रोल उत्तम पद्धतीने साकारलेस तू. खरं तर खूप बोलायचो आम्ही तुझ्या कामाबद्दल, पण आता, आता काय बोलू?
वली खानच्या भूमिकेत तू दिसलास, चमकवलास तू life of pie, फक्त बॉलीवूडच नाही,  तर आख्ख्या भारताची मान केलीस तू" high".
साजन फर्नांडिस म्हणून तू सगळ्यांनाच आवडलास, लंच बॉक्ससारखा नाजूक सिनेमा तू साकारलास.
तिथे नाजूक, पण इथे अति कणखर,
असा पानसिंग तोमर तू निभावलास.

आम्ही तुझा प्रवास फक्त बघतच राहिलो. तुझ्या कलेच्या प्रेमात पाडलंस तू आम्हाला.
 इतका strong fighter तू,
 मग आज का सोडून गेलास आम्हाला?

तुझ्याबद्दल बोलू तितके कमीच आहे. तुझ्या प्रत्येक भूमिकेतून तू आख्ख्या जगाला हरपून टाकले आहेस. आज तू नाहीयेस आमच्यामध्ये, ह्याचे प्रचंड दुःख होतंय. पण अभिमान आहे, की आमचा सगळ्यांचा आवडता माणूस सहजासहजी नाही गेला. तो लढला, त्याने आजारी असताना सुद्धा फक्त कलेच्या प्रेमापोटी, अजून एक सिनेमा केला आणि आम्हाला सगळ्यांना अजून एक आशा दिली. तू कायमच आमच्या मनात राहशील, कारण तू जो ठसा उमटविला आहेस, तो इतक्या सहजी मिटणार नाहीच. इरफान, तुला भावपूर्ण आदरांजली.

- केतकी म्हसवडे

No comment

Leave a Response