Primary tabs

तू म्हणजे....

share on:

 

तुझ्या येण्याने प्रत्येक क्षण बहरत जातो अन्
आयुष्य ही सुगंधाने मोहरून जातं.

तू येत राहा असाच माझ्या आयुष्यात

फुलत राहा अन् फुलवत राहा.

साऱ्या जीवनात तुझाच गंध पसरवत राहा.
जगण्यातला आनंद वाटत रहा.

 

तू म्हणजे मांगल्याची सुरुवात

उत्सवाची ज्योत उत्कटतेेची परिसीमा

उल्हासाचा स्रोत, आनंदाची द्योत
तुझ असणं खरंच किती मोलाचं

 

साऱ्या आनंदाची उधळण

तुझ्या सुगंधाच्या श्वासानेच होते

तू श्वास सुगंधाचा
तू ध्यास कोमेजलेल्या मनाचा

 

ती खास जगण्यातील जिवंतपणाचा
तू भास आत्यंतिक आनंदाचा

 

तू आभास  या आयुष्याचा
तू म्हणजे साैंदर्य तू म्हणजे साज

तू म्हणजे सजणे
तू म्हणजे लाजणे, हसणे

नकळत तुझ्या गंधात हरवून जाणे तुझ्यात
विसावताना भान हरपणे

- नम्रता धुमाळ

No comment

Leave a Response