पत्र क्र. २
सोहू..!!!
अनपेक्षित..अनपेक्षित..अनपेक्षित..नव्या शहरात,नव्या जगात अशी जुनी ओळख भेटेल अनपेक्षित.कसा आहेस सोहू? अरे पुढे होऊन भेटायचं तरी. मी काय तुला मारणार नव्हते.माझ्याकडून धपाटे खायचं वय निघून गेलं आता..असो..
मुंबईत येऊन आठ दिवस झाले. कामाच्या गडबडीत दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. डॅडने कामाचा खूप पसारा करून ठेवला आहे. And as u know हा पसारा सांभाळणारी अजून तरी मीच आहे.आजचं तुझ पत्र पाहिलं अन् आजच लिहायलाही घेतलं. 'रती' या नावाने माझ्या अस्तित्वाची ओळख करून देणारा फक्त तू अन् तूच आहेस.
मलाही तुझ्याशी बोलायला आवडेल. पण सध्या कामाचा व्याप भरपूर आहे.निवांत वेळ मिळाला की बोलूच. तुला भेटायला ही आवडेल मला. तोवर पत्रव्यवहार चालू राहिला तरी मला चालणार आहे. आता थांबते, पुन्हा बोलूच.
मीरा
उत्कर्षा सुमित
लेखक:
No comment