Primary tabs

माया

share on:

काही लोकं ही आपल्या आयुष्यात अवकाळी पावसासारखी येतात. कल्पना नसताना येतात, बरसून जातात किंवा ही माणसं पहाटे पडलेल्या गोड स्वप्नांसारखी असतात. काही क्षणांकरिता आयुष्य आपल्या सहवासाने सुखावह करून जातात.

अंजनच्या आयुष्यात माया अशीच येते. अचानक येते आणि मग त्याच्या मनावर स्वार होते. म्युझिक क्लास सुरू असताना पियानोच्या आवाजापेक्षा अंजनला मायाच्या पैंजणांचा आवाज अधिक भावतो. तिचं मनमोकळं वागणं, तिचं एक्सट्रोव्हर्ट असणं हे त्याच्या मनावर हवी होतं. माया अंजनला विचारते

"ड्रिंक्स, स्मोक करतोस का?" यावर अंजनने नकारात्मक उत्तर दिल्यावर माया त्याला क्षणात जज करते. पण मायाला साधासुधा वाटणारा अंजन प्रत्यक्षात मात्र खूप वेगळा माणूस आहे.मायाला अधिक जाणून घेण्यासाठी अंजन wrong number चा खेळ सुरू करतो, या खेळात मायासोबत तो म्युझिकपासून तिच्या स्वभावापर्यंत सर्व गोष्टीवर चर्चा करतो. तिच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करतो.

आणि मग वेगळंच घडत. माया प्रेमात पडते या खेळाच्या, खेळ सुरू केलेल्या माणसाच्या.शॉर्टफिल्ममधील ते दृश्य फार सुंदर आहे जेव्हा माया आपल्या प्रेमाची कबुली अंजनजवळ देते. बॅग्राऊंडला पावसाचा आवाज आणि अंजनच्या मनात चाललेल्या विचारांचा कल्लोळ.

शेवटी अंजन खेळाची खरी गोष्ट मायाला सांगतो का? की ही प्रेमकहाणी अर्धवट राहते? पहा खालील लिंकवर क्लीक करून

https://youtu.be/LSqzdCNzB-E

 

भाग्यश्री भोसेकर-बीडकर.

लेखक: 

No comment

Leave a Response