Primary tabs

मनीषा

share on:

देवा जन्म मिळाला स्त्रीचा
हाच का रे गुन्हा आमचा
कधी संपेल रे भोग आमचा
न्यायदेवता करील का विचार याचा.?

हरवली आहे वीण माणुसकीची
भीतीच नाही मुळी कायद्याची
काय अवस्था झाली असेल देहाची
आई म्हणायला जिभही ठेवली नाही तिची

रंगवली असतील अनेक स्वप्ने तिनेही
पण रंग भरण्याआधीच विरून गेली
माणसातील राक्षसी भावनेने
वेल वरती चढण्यआधीच खुंटली

एकीकडे मिरवतो आम्ही
आमची स्त्री अबला नाही बर का
आणि परत नाहक बळी जातो
मनीषा सारख्या निष्पाप मुलींचा 

- प्रमोद शिंदे

लेखक: 

No comment

Leave a Response