Primary tabs

पासपोर्टही आता अॅपवरुन... 

share on:

डिजिटल इंडिया अभियानांतर्गत देशात विविध सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याच धर्तीवर आधारित पासपोर्ट सेवा आता अधिक सुकर झाली आहे. पासपोर्ट सेवेचा लाभ आता एका अॅपच्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार आहे. त्याविषयी...

देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. या अंतर्गत देशात विविध सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याच धर्तीवर आधारित पासपोर्ट सेवा आता अधिक सुकर झाली आहे. पासपोर्ट सेवेचा लाभ एका अॅपच्या माध्यमातून आता घरबसल्या घेता येणार आहे. अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पासपोर्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. ‘पासपोर्ट सेवा दिना’चे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: पासपोर्टमधील बदलांची माहिती दिली. ‘डिजिटल इंडिया अभियानामार्फत सरकारचा देशाला एक माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनविण्याचा प्रयास आहे.

यामध्ये डिजिटल लॉकर, ई-एज्युकेशन, ई-हेल्थ, ई-साईन आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यांसारख्या एक लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या योजना आहेत. ११ राज्यांत ‘भारतनेट’ आणि ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्क’ योजना राबविणार, नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, माहिती-तंत्रज्ञान व संवाद खाते यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मुख्यतः पासपोर्ट काढताना नागरिकांना याआधी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असे. त्यामुळे अनेक वेळा नागरिक पासपोर्ट काढण्याच्या कटकटीला बगल देऊन दलालांमार्फत पासपोर्ट काढण्यावर भर देत. त्यामुळे पासपोर्ट काढून देणारी एक वेगळीच जमात निर्माण झाली. ती आजही अस्तित्वात आहेच, पण त्यातील गैरप्रकारांना आता आळा बसेल, हे नक्की. पासपोर्ट काढण्यापासून तो हातात येईपर्यंत दलालांची यंत्रणा बोकाळली होती. पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा पासपोर्ट लवकर हवा असेल, अशा अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागत होते. अनेक गरजू याच मार्गाने पासपोर्ट मिळवतही होते. आजही हे प्रकार कमीअधिक प्रमाणात सुरू आहेतच पण अशा सुविधांमुळे आता या प्रकारांवर आळा बसेल.

- तन्मय टिल्लू

content@yuvavivek.com 

 

लेखक: 

No comment

Leave a Response